CBSE Pattern in Maharashtra 2025: महाराष्ट्रातील शाळांमध्ये सीबीएसईसारखा अभ्यासक्रम – शैक्षणिक वर्ष आणि अभ्यासक्रमात मोठा बदल!

By MarathiAlert Team

Updated on:

CBSE Pattern in Maharashtra 2025 : महाराष्ट्रातील शाळांसाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी CBSE Pattern अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर बदलला जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CBSE Pattern in Maharashtra 2025

राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला. शालेय शिक्षण मंत्री ना. श्री. दादा भुसे यांनी विधानसभेत या निर्णयाची घोषणा केली.

टप्पा १: येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून फक्त इ. पहिलीसाठी CBSE पॅटर्न लागू होणार.

टप्पा २: पुढील शैक्षणिक वर्षात दोन टप्प्यात दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी CBSE पॅटर्न लागू होणार.

  • CBSE पॅटर्न लागू केल्याने शाळांमध्ये कुठलीही फी वाढ होणार नाही.
  • CBSE पॅटर्न अंगीकारत असताना ३०% पर्यंतची स्थानिक सवलत आहे, त्यात आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, आणि मराठी भाषेला प्राधान्य दिले जाणार.
  • शिक्षकांना देखील CBSE अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाणार.
  • मराठीतूनही CBSE अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात येणार आहे.
  • ज्या विषयांची आवश्यकता असेल, त्या विषयांची पाठ्यपुस्तकं मराठीत असतील.

शाळा कधी सुरू होणार?

अनेकांना शंका होती की, महाराष्ट्रातील शाळा 1 एप्रिलपासून सुरू होणार का? मात्र, शिक्षण विभागाने याबाबत स्पष्टता दिली आहे. राज्यातील सर्व शाळा (Maharashtra School Academic Year 2025) एप्रिलऐवजी जुनपासूनच सुरू होतील. त्यामुळे पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही.

नवीन अभ्यासक्रम कसा असेल? CBSE Pattern in Maharashtra 2025

राज्य शिक्षण मंडळाने पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला नवीन अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (New Education Policy Maharashtra) 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बदल करण्यात आले आहेत. पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने हा अभ्यासक्रम इतर वर्गांसाठीही लागू केला जाईल.

शिक्षक आणि पालकांचा गोंधळ

शैक्षणिक वर्ष बदलणार असल्याच्या अफवांमुळे शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षण विभागाने कोणतीही अधिकृत माहिती न देता हा निर्णय घेतल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्यात आला होता.

शिक्षण विभागाचा खुलासा

राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी स्पष्ट केले आहे की, शाळांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. शाळा नेहमीप्रमाणे जूनमध्येच सुरू होतील. मात्र, ‘एनईपी’नुसार पहिली आणि शक्य झाल्यास दुसरीसाठी नवे अभ्यासक्रम आणि बदललेल्या पद्धतीने शिक्षण दिले जाईल, परंतु शाळा नेहमीप्रमाणे जूनमध्येच सुरू होतील.

महत्त्वाचे मुद्दे:

  • शाळा 1 एप्रिलऐवजी जुनमध्येच सुरू होणार.
  • पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू.
  • अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर तयार.
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार टप्प्याटप्प्याने बदल.
  • इतर वर्गांसाठी वेळापत्रकात कोणताही बदल नाही.

NMMS Result : शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी निकाल जाहीर

निष्कर्ष

महाराष्ट्र सरकारने CBSE पॅटर्न (CBSE Pattern in Maharashtra 2025) आधारित नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 नुसार तयार करण्यात आला असून, पहिलीपासून टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल.

मात्र, शैक्षणिक वर्ष बदलण्याबाबतची चर्चा निराधार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळा नेहमीप्रमाणे जूनमध्येच सुरू होतील, त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नवीन अभ्यासक्रम गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सकारात्मक बदल घडवेल.

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

1 thought on “CBSE Pattern in Maharashtra 2025: महाराष्ट्रातील शाळांमध्ये सीबीएसईसारखा अभ्यासक्रम – शैक्षणिक वर्ष आणि अभ्यासक्रमात मोठा बदल!”

  1. CBSE पेक्षा MH state board syllabus सर्वांगीण विकास होईल असा आहे. Syllabus same ठेऊन paper pattern CBSE सारखा करणे खूप फायद्याचे ठरेल विद्यार्थ्यांना This is my personal opinion

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!