छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत मेगा भरती, 10 वी ते पदवीधरांसाठी मोठी संधी!

Published On: March 20, 2026
Follow Us
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Recruitment 2026

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मार्फत 2026 साठी गट-क पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. विविध विभागांमध्ये एकूण 222 पदे भरली जाणार असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. नवीन अपडेट नुसार आता या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. सविस्तर माहिती पाहूया.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 अधिसूचना

या भरतीची अधिकृत जाहिरात 16 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

पदनिहाय रिक्त जागा

या भरतीमध्ये एकूण २२२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांचे नाव आणि संख्या खालीलप्रमाणे आहे.

Sambhajinagar Municipal Corporation Recruitment 2026
  • कनिष्ठ अभियंता (Civil) – 32 पदे
  • उप अग्निशमन केंद्र अधिकारी – 4 पदे
  • सहायक सुरक्षा अधिकारी – 1 पद
  • बांधकाम/अतिक्रमण निरीक्षक – 24 पदे
  • स्वच्छता निरीक्षक – 12 पदे
  • पशुधन पर्यवेक्षक – 7 पदे
  • चालक-यंत्रचालक – 15 पदे
  • उद्यान/कृषी सहाय्यक – 6 पदे
  • अनरेखक (Tracer) – 9 पदे
  • अग्निशामक – 100 पदे
  • रोखपाल – 12 पदे

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. काही प्रमुख पदांची पात्रता खालीलप्रमाणे आहे.

1) कनिष्ठ अभियंता (Civil)

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची Civil Engineering पदवी (Degree)
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

2) उप अग्निशमन केंद्र अधिकारी

  • कोणत्याही शाखेची पदवी (Graduate)
  • Fire Engineering संबंधित कोर्स (Station Officer / BE Fire / IFE इ.)
  • संबंधित क्षेत्रात अनुभव आवश्यक

3) सहाय्यक सुरक्षा अधिकारी

  • कोणत्याही शाखेची पदवी
  • लष्कर/पोलीस दलात किमान 3 वर्षांचा अनुभव

4) बांधकाम / अतिक्रमण निरीक्षक

  • Civil Engineering Diploma
    किंवा
  • ITI मधील संबंधित कोर्स

5) स्वच्छता निरीक्षक

  • कोणत्याही शाखेची पदवी
  • Sanitary Inspector Diploma

6) पशुधन पर्यवेक्षक

  • HSC (12वी) उत्तीर्ण
  • पशुसंवर्धन (Animal Husbandry) डिप्लोमा
  • 2 वर्षांचा अनुभव आवश्यक

7) चालक-यंत्रचालक (Driver Operator)

  • SSC (10वी) उत्तीर्ण
  • Fire Training कोर्स (6 महिने)
  • Heavy Vehicle Driving License
  • 3 वर्षांचा अनुभव

8) उद्यान / कृषी सहाय्यक

  • B.Sc Agriculture / Horticulture / Botany / Forestry
  • 3 वर्षांचा अनुभव आवश्यक

9) अनरेखक (Tracer)

  • SSC (10वी) उत्तीर्ण
  • ITI Draftsman कोर्स

10) अग्निशामक

  • SSC (10वी) उत्तीर्ण
  • Fire Training कोर्स (6 महिने)

11) रोखपाल (Cashier)

  • B.Com (Commerce Degree)
  • Marathi typing 30 wpm + English typing 40 wpm
  • संगणक ज्ञान आवश्यक

महत्वाची टीप

  • सर्व पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे
  • काही पदांसाठी अनुभव व शारीरिक पात्रता आवश्यक आहे
  • अंतिम पात्रता PDF मधील जाहिरात नियमांनुसारच ग्राह्य धरली जाईल. यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू: 17 फेब्रुवारी 2026
  • अर्जाची शेवटची तारीख: 31 मार्च 2026
  • प्रवेशपत्र: परीक्षेच्या 7 दिवस आधी
  • परीक्षा: लवकरच अधिकृत वेबसाईटवर जाहीर

अर्ज फी

  • सामान्य (Open): ₹1000
  • मागासवर्गीय: ₹900
  • माजी सैनिक: फी माफ

वयोमर्यादा

वयोमर्यादेची गणना ३१ जानेवारी २०२६ रोजी केली जाईल.

  • किमान वय: १८ वर्षे पूर्ण
  • खुला प्रवर्ग (Open): जास्तीत जास्त ३८ वर्षे.मागासवर्गीय/अनाथ/EWS: जास्तीत जास्त ४३ वर्षे.
  • दिव्यांग/भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त: जास्तीत जास्त ४५ वर्षे

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल.
१. ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test): बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील.
२. मैदानी चाचणी (फक्त अग्निशमन पदांसाठी): अग्निशमन सेवेतील पदांसाठी १०० गुणांची मैदानी चाचणी होईल.
३. कागदपत्र पडताळणी: गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील.
टीप: गट-क पदांसाठी कोणतीही मुलाखत (Oral Interview) घेतली जाणार नाही.

महत्वाच्या लिंक

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment