कंत्राटी शिक्षकांना मोठा दिलासा! या शैक्षणिक वर्षासाठी पुन्हा सेवेत सामावून घेतले जाणार, शासन निर्णय डाउनलोड करा

Published On: May 28, 2026
Follow Us
contract teacher

राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील ५९७ कंत्राटी कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांच्या कंत्राटी पद्धतीने नियुक्त्यांना पुन्हा एकदा मान्यता दिली आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय २७ मे २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार १८७ कला शिक्षक, २४२ क्रीडा शिक्षक आणि १६८ संगणक शिक्षक अशा एकूण ५९७ शिक्षकांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पुन्हा सेवेत सामावून घेतले जाणार आहे.

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांची एकूण १४९७ पदे बाह्यस्रोतांद्वारे भरण्यास यापूर्वीच मंजुरी मिळालेली आहे. यापैकी मागील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ८४० शिक्षकांना नियुक्तीस मान्यता देण्यात आली होती, मात्र त्यापैकी ५९७ शिक्षकच प्रत्यक्षात सेवेत हजर होते.

याच कार्यरत शिक्षकांची आता आगामी वर्षासाठी निवड केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ही समिती संबंधित शिक्षकांची पुढील काम करण्याची इच्छा विचारून घेईल आणि त्यांच्या आधीच्या कामाची समाधानकारकता तपासूनच त्यांच्या नियुक्ती करण्यात येणार आहे.

या नियुक्त्या निव्वळ कंत्राटी स्वरूपाच्या असून त्या नेहमीप्रमाणे प्रथमतः ११ महिन्यांसाठी असतील. तसेच, या शिक्षकांना भविष्यात नियमित सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि इतर लाभांवर कोणताही हक्क सांगता येणार नाही, अशी स्पष्ट अट शासनाने घातली असून नियुक्ती आदेशातही ती नमूद केली जाणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित होणार? सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय निर्गमित

महत्त्वाची बाब म्हणजे या नियुक्त्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT) आणि उच्च न्यायालयात दाखल असलेल्या विविध याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहूनच केल्या जाणार आहेत. या सर्व ५९७ कंत्राटी शिक्षकांच्या मानधनाचा खर्च शासनाच्या ‘आश्रमशाळा समूह’ या योजनेअंतर्गत मंजूर तरतुदीमधून केला जाणार आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळांमधील क्रीडा, कला व संगणक शिक्षकांची कंत्राटी पध्दतिने निवड करण्याबाबत अधिकृत शासन निर्णययेथे डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment