Eid E Milad Holiday In Mumbai : ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टीच्या तारखेत बदल!

Published On: September 4, 2025
Follow Us
Eid E Milad Holiday In Mumbai

Eid E Milad Holiday In Mumbai: मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी यापूर्वी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ऐवजी सोमवार दि. ८ सप्टेंबरला असणार आहे.

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.

राज्यात बंधुता आणि एकता टिकावी या हेतूने मुस्लीम समाजाने ईद-ए-मिलाद निमित्त काढला जाणारा जुलूस कार्यक्रम ६ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील ५ सप्टेंबर रोजी जाहीर झालेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती ८ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे.

यामुळे मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

शनिवार दि ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण आहे. राज्यात बंधुता आणि हिंदू – मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर रोजीची सुट्टी आता सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे.

अधिसूचना येथे डाऊनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

zp-teacher-promotion-gr-2026

जिल्हा परिषद शिक्षक पदोन्नतीसाठी नवीन कार्यपद्धती जाहीर; TET/CTET पात्रता, निश्चित वेळापत्रकासह शासनाचा मोठा निर्णय

July 31, 2026
saman-kam-saman-vetan-medical-officers-asha-workers-rules-update

वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘समान काम, समान वेतन’चा प्रस्ताव; आशा स्वयंसेविकांच्या नियमावलीतही होणार बदल

July 30, 2026
government-employees-headquarters-leave-rule-circular-july-2026

मुख्यालय सोडण्यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांनी हे जाणून घ्या; सामान्य प्रशासन विभागाचे नवीन परिपत्रक जारी

July 30, 2026
BLO Duty Allowance GR

बीएलओ कर्मचारी अधिकारी यांचे मानधन मंजूर, शासन निर्णय जारी

July 29, 2026
anganwadi sevika salary july 2026

अंगणवाडी सेविका व मदतनीस जुलै 2026 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

July 28, 2026
aarogya vibhag aadhava

आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे विशेष कौतुक; आरोग्य विभागाची विभागीय आढावा बैठक संपन्न

July 25, 2026

Leave a Comment