Electric Bike Taxi आता आपल्या शहरात! जाणून घ्या संपूर्ण नियम!

Published On: April 22, 2025
Follow Us
Electric Bike Taxi

Electric Bike Taxi राज्यातील 1 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. या सेवेमुळे नागरी वाहतुकीला चालना मिळणार असून, विशेषतः सार्वजनिक वाहतूक न पोहोचलेल्या भागांत प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 21 एप्रिल 2025 रोजी गृह विभाग, महाराष्ट्र शासनाने दुचाकी टॅक्सी सेवा कार्यपद्धती जाहीर केली आहे.

मंत्रीमंडळ बैठकीत दुचाकी टॅक्सी सेवा सुरू करण्यास मान्यता

केंद्र सरकारने 2020 मध्ये “मोटार वाहन एग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे” जारी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र शासनाने दुचाकी टॅक्सीसाठी श्री. रमणाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या अहवालाच्या आधारे 01 एप्रिल 2025 रोजी मंत्रीमंडळ बैठकीत दुचाकी टॅक्सी सेवा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.

दुचाकी टॅक्सी सेवा कशी असेल? | Electric Bike Taxi

दुचाकी टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक पात्रता

  • किमान ५० इलेक्ट्रिक दुचाकी असलेल्या व्यक्ती/संस्थेला परवाना दिला जाईल.
  • परवाना ५ वर्षांसाठी वैध असेल.
  • सर्व दुचाकी इलेक्ट्रिक असाव्यात व एकसारख्या रंगात रंगवल्या जातील.
  • चालकांचे वय 20 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे.

सुरक्षा उपाय: प्रत्येक दुचाकीवर GPS ट्रॅकिंग, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट सुविधा असणे बंधनकारक असून, महिला प्रवाशांसाठी चालक आणि प्रवाशामधील विभाजक सुविधा असणार आहे. तर अपघात/मृत्यू यासाठी विमा संरक्षण सेवा आवश्यक आहे.

अॅप व वेबसाइट: सेवा ही अधिकृत अॅप अथवा संकेतस्थळावरूनच दिली जाणार आहे. सेवा सुरू करणाऱ्या कंपन्यांना सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण करणं बंधनकारक आहे.

दर व अंतर: प्रवासासाठी कमाल अंतर 15 किमी असणार असून, दरांचे निर्धारण प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाद्वारे केले जाईल.

महिलांसाठी विशेष तरतुदी: भविष्यात दुचाकी चालकांपैकी 50% महिला चालक असाव्यात यासाठी टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार आहे.

Electric Bike Taxi ही योजना केवळ वाहतुकीस चालना देणारी नव्हे तर पर्यावरणपूरक व रोजगारनिर्मिती करणारी ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या या पुढाकारामुळे नव्या काळातील स्मार्ट मोबिलिटी सोल्युशन चा आरंभ होत आहे.

अधिक माहितीसाठी: शासन निर्णय येथे डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment