MCA Normalization 2026: CET Percentile कसा ठरतो? सोप्या उदाहरणासह पूर्ण माहिती

Published On: March 29, 2026
Follow Us
MCA Normalization 2026

MCA CET परीक्षा अनेक शिफ्टमध्ये घेतली जाते. प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्नपत्रिका वेगळी असते आणि त्यामुळे सर्व पेपरची अवघडपणा पातळी एकसारखी असेलच असे नाही. याच समस्येवर उपाय म्हणून Normalization पद्धत वापरली जाते. MCA Normalization 2026 ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे कोणालाही पेपर सोपा किंवा कठीण आल्यामुळे अतिरिक्त फायदा किंवा तोटा होत नाही.

Normalization का आवश्यक आहे?

वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्यामुळे काही प्रश्नपत्रिका तुलनेने सोप्या तर काही कठीण असू शकतात. अशा परिस्थितीत फक्त raw marks (मूळ गुण) पाहून निकाल लावणे योग्य ठरत नाही. म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांचे गुण एकाच मापदंडावर आणण्यासाठी Normalization पद्धत वापरली जाते.

ही पद्धत भारतातील अनेक मोठ्या स्पर्धा परीक्षांमध्ये वापरली जाते आणि ती एक प्रमाणित प्रक्रिया आहे.

Percentile Score म्हणजे काय?

Normalization प्रक्रियेत Percentile Score खूप महत्त्वाचा असतो. Percentile म्हणजे तुमच्यापेक्षा किती टक्के विद्यार्थ्यांनी कमी किंवा तुमच्याएवढे गुण मिळवले आहेत हे दर्शवणारा स्कोर.

उदाहरणार्थ, जर तुमचा Percentile 90 असेल, तर याचा अर्थ असा की 90% विद्यार्थ्यांचे गुण तुमच्यापेक्षा कमी किंवा समान आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे Percentile हा percentage (टक्केवारी) नसतो. तो relative performance दाखवतो.

Percentile कसा काढला जातो?

Percentile Score हा प्रत्येक शिफ्टसाठी वेगळा काढला जातो. त्या शिफ्टमध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांच्या तुलनेत तुमची रँक ठरते आणि त्यानुसार Percentile दिला जातो.

सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला त्या शिफ्टमध्ये 100 Percentile दिला जातो. त्याखालील विद्यार्थ्यांचे Percentile त्यांच्या कामगिरीनुसार कमी होत जातात. हा स्कोर 7 दशांश पर्यंत काढला जातो, त्यामुळे समान गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी राहते.

MCA Normalization 2026 प्रक्रिया कशी होते?

Normalization प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाते. सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिवसांमध्ये आणि शिफ्टमध्ये समान प्रमाणात विभागले जाते. यामुळे कोणत्याही प्रकारचा पक्षपात होण्याची शक्यता कमी होते.

यानंतर प्रत्येक शिफ्टचा निकाल raw marks च्या आधारावर तयार केला जातो. त्या प्रत्येक शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांचे Percentile Score काढले जातात.

शेवटी, सर्व शिफ्टचे Percentile Score एकत्र करून Final CET Score तयार केला जातो. हाच स्कोर विद्यार्थ्यांच्या मेरिट आणि अॅडमिशनसाठी वापरला जातो.

MCA Normalization 2026 उदाहारण

समजा MCA CET परीक्षा 4 वेगवेगळ्या sessions (शिफ्ट) मध्ये झाली. प्रत्येक session मध्ये विद्यार्थ्यांची संख्या आणि पेपरची कठीणता थोडी वेगळी असू शकते.

चार sessions मध्ये विद्यार्थ्यांची संख्या अशी होती.

  • Session 1 मध्ये 2249 विद्यार्थी
  • Session 2 मध्ये 2272 विद्यार्थी
  • Session 3 मध्ये 2216 विद्यार्थी
  • Session 4 मध्ये 2257 विद्यार्थी

प्रत्येक session मध्ये highest marks वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ:

  • Session 1 highest = 154
  • Session 2 highest = 157
  • Session 3 highest = 149
  • Session 4 highest = 161

आता इथेच Normalization लागू होते.

Step 1: प्रत्येक session चा topper = 100 Percentile

जरी marks वेगळे असले तरी प्रत्येक session मधील टॉपरला 100 Percentile दिला जातो.

उदाहरण:

  • Session 1 मध्ये 154 marks असलेला topper → 100 Percentile
  • Session 2 मध्ये 157 marks असलेला topper → 100 Percentile

याचा अर्थ असा की त्या session मध्ये त्याच्यापेक्षा जास्त गुण कुणालाच नाहीत.

Step 2: Percentile कसा ठरतो?

Formula सोप्या भाषेत असा आहे: तुमच्यापेक्षा कमी किंवा equal marks मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ÷ त्या session मधील एकूण विद्यार्थी × 100

उदाहरण समजून घ्या: Session 1 मध्ये 2249 विद्यार्थी आहेत आणि topper ला 154 marks आहेत

तर 2249 विद्यार्थ्यांचे marks ≤ 154 आहेत म्हणून 2249 ÷ 2249 × 100 = 100 Percentile म्हणजे topper = 100 Percentile

Step 3: बाकी विद्यार्थ्यांचे काय?

समजा एखाद्या विद्यार्थ्याला 153 marks मिळाले. तर त्याच्यापेक्षा कमी किंवा equal marks असणारे विद्यार्थी थोडे कमी असतील. त्यामुळे त्याचा Percentile 100 पेक्षा थोडा कमी येईल.

153 marks → 99.91 Percentile (approx) म्हणजे तो जवळपास topper आहे पण थोडा खाली.

Step 4: खूप कमी marks असलेले विद्यार्थी

उदाहरणात शेवटी काही विद्यार्थ्यांचे marks 0, 1, 2 असे आहेत.

त्यांचे Percentile खूप कमी येतात, जसे: 0 marks → ~0.088 Percentile

म्हणजे जवळपास सर्वांनी त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

Step 5: Final Result कसा बनतो?

प्रत्येक session साठी Percentile वेगळा काढला जातो
नंतर सर्व sessions चे Percentile एकत्र merge केले जातात आणि Final CET Score तयार होतो.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा

154 marks आणि 157 marks वेगळे आहेत पण दोन्ही session मधील topper ला 100 Percentile मिळतो म्हणूनच MCA Normalization 2026 मध्ये raw marks पेक्षा Percentile जास्त महत्वाचा असतो.

Normalization मुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होतो?

Normalization पद्धतीमुळे परीक्षा अधिक न्याय्य बनते. कोणाला सोपा पेपर आला आणि कोणाला कठीण, याचा निकालावर परिणाम होत नाही.

यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याची खरी क्षमता आणि कामगिरी योग्य प्रकारे मोजली जाते. त्यामुळे अॅडमिशन प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष राहते.

महत्त्वाची सूचना: Total Percentile हा विषयानुसार Percentile चा सरासरी नसतो. तो एक स्वतंत्र स्कोर असतो जो एकूण कामगिरीवर आधारित असतो.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी फक्त raw marks वर लक्ष न देता Percentile कसा काम करतो हे समजून घेणे गरजेचे आहे.

MCA Normalization 2026 ही प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक शिफ्टमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये समानता राखण्यासाठी ही पद्धत आवश्यक आहे. जर तुम्ही MCA CET देत असाल, तर Percentile आणि Normalization कसे काम करतात हे समजून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

अधिक माहितीसाठी: MCA Normalization 2026 PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी)

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment