MHT CET PCB Result 2026: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (State CET Cell, Maharashtra) यांनी MHT CET 2026 PCB (Physics, Chemistry, Biology) गटाच्या दुसऱ्या प्रयत्नाचा (Second Attempt) निकाल 18 जून 2026 रोजी अधिकृतपणे जाहीर केला आहे. 10 आणि 11 मे 2026 रोजी चार सत्रांमध्ये झालेल्या या परीक्षेचा निकाल आता विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यंदाच्या दुसऱ्या प्रयत्नात एकूण 1,16,540 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 95,631 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहिले असून उपस्थितीचे प्रमाण 82.06 टक्के इतके राहिले आहे.
दुसऱ्या प्रयत्नातील उपस्थितीचा तपशील
अधिकृत आकडेवारीनुसार एकूण 43,611 पुरुष, 72,927 महिला आणि 2 इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 35,345 पुरुष, 60,285 महिला आणि 1 इतर प्रवर्गातील उमेदवारांनी परीक्षा दिली. पुरुषांची उपस्थिती 81.05 टक्के, महिलांची 82.66 टक्के आणि एकूण उपस्थिती 82.06 टक्के नोंदविण्यात आली आहे.
4 विद्यार्थ्यांनी मिळविले 100 पर्सेंटाईल
यावर्षी PCB गटाच्या दुसऱ्या प्रयत्नात एकूण 4 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
100 पर्सेंटाईल मिळविणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.
- चेड्डा जिल हितेश (पालघर)
- मोहनीश मारुती भोसले (पुणे)
- मुस्कान मुकेश नथानी (छत्रपती संभाजीनगर)
- रौशमित गुप्ता (मुंबई शहर)
ओपन प्रवर्गातील टॉपर: ओपन प्रवर्गात वरील चारही विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.
विविध आरक्षण प्रवर्गातील टॉपर
दुसऱ्या प्रयत्नात विविध आरक्षण प्रवर्गातील अव्वल विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.
- OBC प्रवर्गातून कोल्हापूर जिल्ह्यातील साहिम सादिक पटवेगर यांनी 99.9958661 पर्सेंटाईल मिळविले.
- SEBC प्रवर्गातून सांगली जिल्ह्यातील निलाभ शरद कदम यांनी 99.9914897 पर्सेंटाईल मिळविले.
- SC प्रवर्गातून अकोला जिल्ह्यातील संदेश ज्ञानेश्वर खडसे यांनी 99.9629797 पर्सेंटाईल मिळविले.
- ST प्रवर्गातून रायगड जिल्ह्यातील अर्जुन सुधीर पेंडोर यांनी 99.9545267 पर्सेंटाईल मिळविले.
- DT/VJ प्रवर्गातून जळगाव जिल्ह्यातील गिरीश मंगळसिंग गोठवाल यांनी 99.9875982 पर्सेंटाईल मिळविले.
- NT-B प्रवर्गातून बुलढाणा जिल्ह्यातील श्रद्धा संतोष हिवरकर यांनी 99.8730535 पर्सेंटाईल मिळविले.
- NT-C प्रवर्गातून सोलापूर जिल्ह्यातील ओम सुरेश बिचकुले यांनी 99.9661476 पर्सेंटाईल मिळविले.
- NT-D प्रवर्गातून नांदेड जिल्ह्यातील देवानंद उद्धव चाटे यांनी 99.9446832 पर्सेंटाईल मिळविले.
- SBC प्रवर्गातून पुणे जिल्ह्यातील रणेश मुचपथी यांनी 99.9958866 पर्सेंटाईल मिळविले.
- OMS प्रवर्गातून बेळगाव येथील पूर्वा श्रीधर कुलकर्णी यांनी 99.9794332 पर्सेंटाईल मिळविले.
निकाल कुठे पाहता येईल?
MHT CET PCB Group Second Attempt 2026 चा निकाल CET Cell च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. उमेदवारांना त्यांच्या Application Number आणि Password किंवा जन्मतारखेच्या साहाय्याने लॉगिन करून निकाल पाहता व स्कोअरकार्ड डाउनलोड करता येईल.
MHT CET PCB Group Second Attempt Result 2026 Direct Link
विद्यार्थ्यांसाठी पुढील टप्पा
निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांनी CAP (Centralized Admission Process) संदर्भातील अधिकृत वेळापत्रकावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, B.Sc. Nursing तसेच इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.
| MHT CET PCB Group Second Attempt 2026 | Result direct Link |
| CET CELL | Official Website |
| MHT-CET 2026 ((PCB ) Second Attempt) | Result Summary PDF |







