MHT CET Result 2025 महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) परीक्षा वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या वेळेत (Shift) मध्ये संपन्न झाली आहे. यंदा MHT-CET (इंजिनिअरिंग/फार्मसी) परीक्षेसाठी राज्यभरातून 7,25,773 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, यापैकी 6,75,445 एवढ्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आहे. आता या परीक्षांचा निकाल कधी जाहीर होणार? (MHT Cet 2025 Result Date) याबाबत विद्यार्थ्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. यावर्षी CET Cell कडून निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.
Table of Contents
MHT CET Answer Key 2025
महाराष्ट्र सीईटी सेलकडून MHT CET 2025 ची अधिकृत उत्तरतालिका (Answer Key) लवकरच जाहीर होणार आहे. उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर, ती विद्यार्थ्यांना cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल.
तात्पुरती (Provisional) उत्तरतालिका प्रथम जाहीर होईल
प्रथम तात्पुरती उत्तरतालिका दिली जाईल. जर कोणत्याही विद्यार्थ्याला उत्तरांबाबत शंका असेल किंवा चुकीचं उत्तर वाटत असेल, तर तो ऑनलाइन आक्षेप (Objection) नोंदवू शकतो. सर्व आक्षेप तपासल्यानंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल. उत्तरतालिकेसोबतच, विद्यार्थ्यांना त्यांच्या Response Sheet आणि प्रश्नपत्रिकेची PDF सुद्धा मिळेल.
MHT CET 2025 उत्तरतालिका कशी डाउनलोड करावी?
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या – cetcell.mahacet.org
- “MHT CET Answer Key 2025” या लिंकवर क्लिक करा
- एक Login पेज उघडेल
- तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका
- “Sign in to account” वर क्लिक करा
- तुमच्या स्क्रीनवर उत्तरतालिका, रिस्पॉन्स शीट आणि प्रश्नपत्रिका दिसेल
विद्यार्थ्यांनी ही उत्तरतालिका वापरून आपल्या गुणांचा अंदाज घेता येईल आणि पुढील टप्प्यांसाठी तयारी करता येईल.
MHT CET Result 2025 नवीन निकाल प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा कक्ष (State Common Entrance Test Cell, Maharashtra) ने MHT CET 2025 परीक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. यावर्षी MHT CET Result 2025 निकाल प्रक्रियेमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि विविध सत्रांमध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना समसमान न्याय मिळावा यासाठी Normalization Method (सामान्यीकरण पद्धत) लागू करण्यात आली आहे.
MHT CET 2025 साठी परीक्षार्थ्यांचे गुण ११ वी व १२ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिकांवर घेतले जातील. या प्रक्रियेत उमेदवाराच्या गुणांचे सामान्यीकरण केले जाईल, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समसमान न्याय मिळेल.
MHT CET 2025 Normalization Process म्हणजे काय?
MHT CET ही संगणकाधारित परीक्षा (Computer-Based Test – CBT) असून, मोठ्या संख्येने उमेदवार असल्यामुळे परीक्षा वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेतली जाते. त्यामुळे प्रत्येक सत्रातील प्रश्नपत्रिका समान काठिण्यपातळीची नसते. यामुळे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स सत्रांमुळे अधिक किंवा कमी होऊ शकतात.
हे टाळण्यासाठी, परीक्षेच्या Normalization पद्धतीचा वापर केला जातो. हीच पद्धत JEE Main, NEET, इत्यादी राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये वापरली जाते.
Normalization पद्धतीची सूत्रे (Technical Details)
- Raw Score म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मिळवलेले गुण.
- Normalized Score म्हणजे परीक्षेच्या सर्व सत्रांमधून गुणांची सरासरी आणि प्रसरण (mean आणि standard deviation) वापरून तयार केलेले स्केल गुण.
- गणिती सूत्रांनुसार सर्व उमेदवारांना एकसंध स्केलवर आणले जाते, त्यामुळे निकालात कोणत्याही सत्राचा अन्यायकारक फायदा किंवा तोटा होत नाही.
नॉर्मलायझेशन आणि Percentile गुण काढण्याची प्रक्रिया
- विद्यार्थ्यांचे विभाजन: विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिवसांमध्ये आणि प्रत्येक दिवसात दोन सत्रांमध्ये विभागले जाते. प्रत्येक सत्रात साधारणपणे समान संख्येत विद्यार्थी असतात.
- प्रत्येक सत्राचा निकाल: प्रत्येक सत्राचा निकाल Raw Scores आणि Percentile Scores च्या स्वरूपात तयार केला जातो. हे गुण गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि एकूण गुणांसाठी (Total) स्वतंत्रपणे काढले जातात.
- CET गुणांचे संकलन: चारही सत्रांतील एकूण गुणांचे Percentile गुण एकत्र करून CET गुण तयार केले जातात. हे गुण निकाल तयार करण्यासाठी वापरले जातात.
गुण कसे मोजले जातील?
- PCM/PCB साठी वेगवेगळ्या सत्रांची गणना केली जाईल.
- प्रत्येक सत्रातील “Mean” आणि “Standard Deviation” वापरून normalization formula लावली जाईल.
- अंतिम निकाल “Percentile” स्वरूपात जाहीर केला जाईल – म्हणजे तुम्ही इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठे उभे आहात ते स्पष्ट होईल.
PDF मध्ये प्रत्येक सत्रातील विद्यार्थ्यांचे Raw Score आणि Percentile गुणांचे विभाजन दर्शविणारी तालिका (Table) दिली आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्याचे रोल नंबर, प्रत्येक विषयातील गुण आणि Percentile गुण दर्शविले आहेत.
उदाहरण

निकाल प्रक्रिया आणि कॅल्क्युलेशनमध्ये काय काय समाविष्ट?
घटक | वर्णन |
---|---|
परीक्षेचा प्रकार | संगणकावर आधारित CBT |
सत्र आधारित परीक्षा | होय |
सामान्यीकरण (Normalization) | होय |
अंतिम स्कोअर | Percentile नुसार |
वापरले जाणारे घटक | Mean, Standard Deviation, Raw Scores |
निकालासाठी वापरलेले सूत्र | [(उमेदवाराचा स्कोअर – सत्रातील सरासरी) / सत्रातील प्रसरण] |
महत्वाच्या सूचना
- कोणत्याही शंका असल्यास CET CELL शी संपर्क साधावा किंवा अधिकृत वेबसाईटवर अपडेट्स तपासत राहावेत.
- CET CELL कडून प्रसिद्ध झालेला Normalization Methodology PDF नीट वाचावा.
- निकाल तयार करण्याची पद्धत समजून घेणे आवश्यक आहे, विशेषतः प्रवेश प्रक्रियेत याचा प्रभाव मोठा असतो.
अधिक माहितीसाठी: Normalization document for MHTCET( PCM & PCB)- 2025
अधिकृत वेबसाइट: https://cetcell.mahacet.org