MSEDCL DA Hike: कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता मंजूर; 5 महिन्यांची थकबाकी किती? चेक करा

Published On: March 12, 2026
Follow Us
Mahavitaran DA Hike 2026

MSEDCL कंपनीने प्रशासकीय परिपत्रक क्र. 706 दि. 09 मार्च 2026 जारी करून कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2025 पासून 58% दराने महागाई भत्ता (DA) मंजूर केला आहे. तसेच जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 आणि फेब्रुवारी 2026 या कालावधीतील एकूण 5 महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही थकबाकी मार्च 2026 च्या वेतनासोबत अदा करण्यात येणार असल्याने महावितरण कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. किती मिळणार थकबाकी? सविस्तर पाहूया.

महावितरण कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता मंजूर

महावितरण (MSEDCL) मधील कर्मचाऱ्यांसाठी सुधारित दराने महागाई भत्ता मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयाच्या आधारे महावितरण कंपनीने प्रशासकीय परिपत्रक क्र. 706 दि. 09 मार्च 2026 जारी केले आहे.

या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता (Mahavitaran DA Hike) लागू करण्यात येणार असून त्यानुसार थकबाकीची रक्कमही अदा केली जाणार आहे.

1 जुलै 2025 पासून सुधारित दराने महागाई भत्ता लागू

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा दर 55% वरून 58% करण्यात आला आहे.

याच धर्तीवर महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही दि. 1 जुलै 2025 पासून सुधारित 58% दराने महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे.

हे ही वाचा: MSEDCL कर्मचारी: सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा

जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 कालावधीची थकबाकी अदा

सुधारित महागाई भत्ता जुलै 2025 पासून लागू असला तरी त्या कालावधीत कर्मचाऱ्यांना जुन्या दराने भत्ता मिळत होता. त्यामुळे 1 जुलै 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीतील फरकाची रक्कम थकबाकी म्हणून देण्यात येणार आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतन बिलाद्वारे देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

फेब्रुवारी 2026 पर्यंतची एकूण 5 महिन्यांची थकबाकी मिळणार

परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 तसेच फेब्रुवारी 2026 या कालावधीतील थकबाकी मिळणार आहे. म्हणजेच एकूण 5 महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येणार आहे.

महावितरण प्रशासनाच्या आदेशानुसार सुधारित दराने महागाई भत्ता मार्च 2026 च्या वेतनापासून अदा करण्यात येणार आहे.

तसेच 1 जुलै 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 तसेच फेब्रुवारी 2026 या कालावधीतील थकबाकीची रक्कम मार्च 2026 च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने काढलेल्या दि. 25 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयाच्या आधारे लागू करण्यात आला आहे.

त्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या प्रमाणे महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे, त्याच धर्तीवर महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही सुधारित दर लागू करण्यात आला आहे.

हे ही वाचा: महागाई भत्ता वाढ! 58% DA वाढीमुळे पगारात कितीने होणार वाढ? चेक करा

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार 58% महागाई भत्ता?

महावितरण कंपनीतील नियमित आणि पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे.

तसेच माजी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची आणि थकबाकीची रक्कम संबंधित कार्यालयाने गणना करून Employee Portal मध्ये सादर केल्यानंतर अदा करण्यात येईल.

महागाई भत्ता थकबाकी Calculator

Mahavitaran DA Arrears Calculator













DA Calculator : महागाई भत्ता कॅल्क्युलेटर, तुमचा पगार तपासा!

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. शासनाच्या दि. 25 फेब्रुवारी 2026 च्या निर्णयाच्या धर्तीवर महावितरण कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2025 पासून 58% दराने महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे.

तसेच 1 जुलै 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 आणि फेब्रुवारी 2026 या कालावधीतील एकूण 5 महिन्यांची थकबाकी कर्मचाऱ्यांना मार्च 2026 च्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसोबतच थकबाकीचा आर्थिक लाभही मिळणार आहे.

हे ही वाचा: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्ता; थकबाकी किती मिळेल?

या निर्णयामुळे महावितरणमधील हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून पुढील कालावधीत उर्वरित थकबाकीबाबतचा निर्णयही शासनाच्या धर्तीवर जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिक माहितीसाठी : महावितरण कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता मंजूर, परिपत्रक डाउनलोड करा

MSEDCL da circuler

7th Pay Commission

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Anukampa Niyukati Prastav

अनुकंपा नियुक्तीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

August 14, 2026
retirement-after-government-residence-child-education-maharashtra-gr

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय! पाल्याच्या शिक्षणासाठी शासनाने दिली मोठी सवलत

August 14, 2026
aasha gatparvartak meeting 2026

राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न; बैठकीतील ठळक मुद्दे

August 12, 2026
arogya-vibhag-badli-new-policy-gr-2026

आरोग्य विभाग बदली धोरणात मोठा बदल! गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांना आता विनंती बदलीसाठी नवीन तरतूद

August 11, 2026
arogya vibhag employee latest update

NHM कर्मचारी समायोजन, रिक्त पदभरती आणि पदोन्नतीला गती देण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
public-health-department-state-training-policy-maharashtra-2026

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागासाठी नवीन राज्य प्रशिक्षण धोरण; सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण बंधनकारक

August 8, 2026

Leave a Comment