Minister List Modi 3.0 :केंद्रीय मंत्रिमंडळाची खाते वाटप संपूर्ण यादी पाहा

By Marathi Alert

Updated on:

Minister List Modi 3.0 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या मंत्रिमंडळाची खाते वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 20 राज्यमंत्री यांना खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये 2 केंद्रीय मंत्री, 1 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व 3 राज्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले असून, यामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची खाते वाटप संपूर्ण यादी पाहा

महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री पदाचा, पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पदाचा, प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री, रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री पदाचा कार्यभार , रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदाचा कार्यभार तर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संपूर्ण केंद्रीय कॅबिनेट मंत्री | New Cabinet Minister List Of India

राजनाथ सिंह – संरक्षण मंत्रालय
अमित शाह – गृह मंत्रालय
अश्विनी वैष्णव – रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एस. जयशंकर – परराष्ट्र मंत्रालय
नितीन गडकरी – परिवहन आणि रस्ते विकास मंत्रालय
शिवराज सिंह चौहान – कृषी, पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्रालय
मनोहर लाल खट्टर – ऊर्जा, शहरी विकास मंत्रालय
सीआर पाटील – जलशक्ती मंत्रालय
मनसुख मांडविया – कामगार मंत्रालय
जेपी नड्डा – आरोग्य, रसायन आणि खते मंत्रालय
ललन सिंह – पंचायत राज आणि मत्स्य उत्पादन मंत्रालय
डॉ. विरेंद्र कुमार – सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय
चिराग पासवान – क्रीडा मंत्रालय
किरेन रिजिजू – संसदीय कार्य मंत्रालय
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्रालय
राम मोहन नायडू – नागरी उड्डाण मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – जहाज बांधणी मंत्रालय
ज्युवेअल राम – आदिवासी कार्य मंत्रालय
किशन रेड्डी – कोळसा आणि खणन मंत्रालय
निर्मला सीतारामण – अर्थ मंत्रालय
जीतन राम मांझी – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्रालय
एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग मंत्रालय
ज्योतिरादित्य सिंधिया – टेलिकॉम मंत्रालय
भूपेंद्र यादव – पर्यावरण मंत्रालय
प्रल्हाद जोशी – ग्राहक संरक्षण मंत्रालय
गजेंद्र शेखावत – कला, पर्यटन, सांस्कृतिक मंत्रालय
पीयूष गोयल – वाणिज्य मंत्रालय
हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियम मंत्रालय
गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्रालय

महाराष्ट्रातील ‘चार’ केंद्रीय राज्यमंत्र्यांनी स्वीकारला पदभार

स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री

  1. इंदरजित सिंग राव – सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन, नियोजन मंत्रालय
  2. जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पीएमओ कार्यालय, अॅटोमिक एनर्जी आणि अंतराळ विभाग
  3. अर्जुन मेघवाल – विधी आणि न्याय, संसदीय कार्य मंत्रालय
  4. प्रतापराव जाधव – आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
    जयंत चौधरी – कौशल्य, शिक्षण मंत्रालय

केंद्रीय राज्यमंत्री संपूर्ण यादी | Union Minister of State Complete List

जतीन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
श्रीपाद नाईक – ऊर्जा मंत्रालय
पंकज चौधरी – अर्थ मंत्रालय
कृष्णा पाल – सहकार मंत्रालय
रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय
रामनाथ ठाकूर – कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालय
नित्यानंद राय – गृह मंत्रालय
अनुप्रिया पटेल – आरोग्य आणि कुटुंब विकास, रसायन आणि खते मंत्रालय
व्ही. सोमण्णा – जलशक्ती आणि रेल्वे मंत्रालय
डॉ. चंद्रशेखर पेमासानी – ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालय
एसपी बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय तसेच पंचायत राज मंत्रालय
शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार मंत्रालय
बीएल वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय
अजय टमटा – परिवहन आणि रस्ते मंत्रालय
हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते मंत्रालय
शांतनू ठाकूर – जहाज बांधणी मंत्रालय
रवनीत बिट्टू – अल्पसंख्याक मंत्रालय
सुरेश गोपी – कला, पर्यटन, सांस्कृतिक मंत्रालय
रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण मंत्रालय

नवीन सरकारच्या पहिल्याच दिवशीचा पहिला निर्णय

Leave a Comment

error: Content is protected !!