Pavitra Portal Teacher Recruitment 2025 : राज्यातील शिक्षक सेवक/शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील रिक्त पदांसाठी ऑनलाईन जाहिरात प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
Table of Contents
महाराष्ट्र शिक्षक भरती २०२५: दुसऱ्या टप्प्यातील जाहिरात प्रक्रियेस मुदतवाढ!
महाराष्ट्रातील शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील रिक्त पदांसाठी जाहिरात (Gramin Teacher Bharti 2025) प्रक्रियेस २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व शैक्षणिक संस्थांना रिक्त पदे जाहीर करण्याची संधी मिळणार आहे.
नवीन मुदत: २८ फेब्रुवारी २०२५
सध्याच्या स्थितीमध्ये:
- दिनांक १९ फेब्रुवारी पर्यंत १२१६ शैक्षणिक संस्थांनी १३३७ पदांसाठी जाहिरात प्रक्रिया सुरू केली आहे.
- दिनांक २० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संस्थांना जाहिरात टाकण्यासाठी वेळ देण्यात आला होता, मात्र अजूनही काही संस्था जाहिरात प्रसिद्ध करू शकलेल्या नाहीत.
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीबाबत शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण
अंगणवाडी मदतनीस आणि सेविका जाहिरात – रिक्त पदांचा तपशील
भरती प्रक्रियेतील मुख्य मुद्दे Pavitra Portal Teacher Recruitment 2025
TAIT २०२३ द्वारे शिक्षक भरती:
- राज्यातील शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेला वेग देण्यासाठी “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2023)” आयोजित करण्यात आली होती.
- सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली.
- या चाचणीसाठी एकूण २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले.
- त्यापैकी १,६३,०६१ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केले आहेत.
- “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२” मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयता १ ली ते १२ वीकरिता शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
- पहिल्या टप्प्यातील जानेवारी २०२४ मध्ये प्राप्त जाहिरातीनुसार २१, ६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 414 जागा, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर जाहिरात
- आता टप्पा – २ अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध (Publish) करण्यासाठी दिनांक २०/०१/२०२५ पासून पोर्टलवर (Pavitra Portal Teacher Recruitment 2025) सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे.
- याबाबत मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक ३१/०१/२०२५ रोजी पदभरतीबाबतचा आढावा घेतला असता, अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत.
महत्त्वाची सूचना: विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-3 श्रेणी-2 पदोन्नतीबाबत मार्गदर्शन!
Age Calculator Online By Date Of Birth – जन्मतारखेनुसार वय मोजा! एका क्लिकवर
Pavitra Portal Official Website
राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की, आपल्या अधिनस्त शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी https://tait२०२२.mahateacherrecruitment.org.in संकेतस्थळावर भेट द्यावी.
या सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक २०/०२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.
जाहिरात प्रक्रियेसाठी अधिकृत पोर्टल: https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/
