पोषण ट्रॅकर नवीन आवृत्ती २५.२.७ प्ले-स्टोअर वर डाऊनलोड/अपडेट करण्यासाठी उपलब्ध

Published On: April 1, 2026
Follow Us
Poshan Tracker Home Visit Module Notice 2026

केंद्र सरकारच्या ‘पोषण ट्रॅकर’ (Poshan Tracker) ॲप मध्ये १ एप्रिल २०२६ पासून मोठे तांत्रिक आणि धोरणात्मक बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘गृहभेट’ (Home Visit) मॉड्यूलचे स्वरूप पूर्णपणे बदलण्यात आले असून, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिका यांचे काम अधिक सोपे होणार आहे.

पोषण ट्रॅकर नवीन आवृत्ती २५.२.७ प्ले-स्टोअर वर डाऊनलोड/अपडेट करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

या आवृत्तीमध्ये गृहभेट मोडुलमधे खालील प्रमाणे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत.

वयोगटात वाढ: आता २ ते ३ वर्षांच्या मुलांचाही समावेश

यापूर्वी गृहभेट शेड्यूलरमध्ये केवळ गरोदर महिला, स्तनदा माता आणि ० ते २ वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश होता. मात्र, नवीन बदलांनुसार आता २ ते ३ वर्षे वयोगटातील मुलांचाही गृहभेट शेड्यूलरमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांच्या भेटीची व्याप्ती वाढणार आहे.

नवीन विषय आणि प्रश्नावली

गृहभेटीदरम्यान आता केवळ भेट देऊन चालणार नाही, तर ॲपमध्ये विशिष्ट प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. हे प्रश्न प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या विषयांवर आधारित असतील

  1. पोषण: यामध्ये ANC (प्रसूतिपूर्व तपासणी), स्तनपानाचे महत्त्व आणि सहा महिन्यांनंतरचा पूरक आहार यावर भर दिला जाईल.
  2. बाल विकास: यामध्ये मुलांचे लसीकरण आणि बालपणीचे प्राथमिक शिक्षण (Stimulation) या संदर्भात पालकांना मार्गदर्शन करावे लागेल.

अंगणवाडी सेविकांसाठी ‘स्मार्ट’ सुविधा

ॲपमध्ये आता एक सुव्यवस्थित आराखडा (Framework) देण्यात आला आहे. यामध्ये गृहभेटीदरम्यान नेमके काय बोलावे आणि काय तपासावे यासाठी चेकलिस्ट (Checklist), मार्गदर्शक व्हिडिओ आणि महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश असेल. यामुळे कामात पारदर्शकता आणि सुसूत्रता येईल.

मुख्यसेविका व पर्यवेक्षिकांसाठी सूचना

या संदर्भात सर्व अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिका (Supervisors) यांना तातडीने सूचित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १ एप्रिलपासून सर्व लाभार्थ्यांच्या नोंदी नवीन फॉरमॅटनुसार करणे बंधनकारक असणार आहे.

Poshan Tracker Update

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment