Samaj Kalyan Exam Answer Key PDF Download: समाज कल्याण विभागाच्या परीक्षेची उत्तरतालिका जाहीर!

By MarathiAlert Team

Updated on:

Samaj Kalyan Exam Answer Key PDF Download: सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील वर्ग-3 संवर्गातील पदभरती परीक्षेच्या उत्तरतालिका (Response Sheet) उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध होणार आहेत. याबाबतची माहिती सविस्तर पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समाज कल्याण विभाग भरती Social Welfare Recruitment

समाज कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत वर्ग-3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांसाठी भरती प्रक्रिया (Social Welfare Recruitment) राबविण्यात आली होती. या भरती परीक्षेसाठी 4 मार्च ते 19 मार्च 2025 या कालावधीत राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली.

महाराष्ट्र समाज कल्याण आयुक्तालयाची महत्त्वाची घोषणा – व्यावसायिक चाचणीसंदर्भात नविन सूचना!

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण आयुक्तालय, पुणे कार्यालयाकडून एक महत्त्वपूर्ण घोषणापत्र जारी करण्यात आले आहे. दिनांक 10.10.2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध पदभरतीसाठी व्यावसायिक चाचणी (Proficiency Test) घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चाचणीचे तपशील:

  • परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक क्षमता या विषयांचे प्रश्न असणार.
  • एकूण 120 गुणांची लेखी परीक्षा (100 प्रश्न).
  • यामध्ये 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेतली जाईल.
  • उमेदवारांनी किमान 45% गुण मिळवणे आवश्यक.
  • चुकीच्या उत्तरासाठी 0.30 गुणांची ऋणात्मक marking (Negative Marking) असेल.

🔍 उमेदवारांच्या चाचणीतील गुणांच्या आधारे अंतिम निवडसूची तयार केली जाईल व गुणवत्तेनुसार पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

Social Welfare Recruitment 2024
Social Welfare Recruitment 2024

समाज कल्याण विभाग परीक्षा उत्तरतालिका जाहीर

समाज कल्याण विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी उत्तरतालिका (Response Sheet) 24 मार्च 2025 दुपारी 4:00 वाजल्यापासून 28 मार्च 2025 सायं. 6:00 वाजेपर्यंत उपलब्ध करून दिली जाणार आहे. उमेदवार स्वतःच्या लॉगिन आयडीवर उत्तरतालिका पाहू शकतील.

महत्वाच्या तारखा

  • परीक्षा कधी झाली? ४ ते १९ मार्च २०२५
  • उत्तरतालिका कधी मिळणार? २४ मार्च २०२५ दुपारी ४:०० पासून
  • उत्तरतालिका कधीपर्यंत पाहता येईल? २८ मार्च २०२५ सायंकाळी ६:०० पर्यंत
  • कुठे पाहता येईल? तुमच्या लॉगीन आयडीवर

Samaj Kalyan Exam Answer Key PDF Download

समाज कल्याण विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उत्तरतालिका खालील अधिकृत लिंक वर डाउनलोड करता येईल.

Samaj Kalyan Exam Answer Key PDF Download

अधिकृत वेबसाईट: https://sjsa.maharashtra.gov.in/

आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया

उमेदवारांना उत्तरतालिकेबाबत आक्षेप किंवा सूचना असल्यास त्या 24 मार्च 2025 ते 28 मार्च 2025 या कालावधीत फक्त ऑनलाइन पद्धतीने नोंदविता येतील.

🔹 प्रति प्रश्न शुल्क – ₹100/-
🔹 आक्षेपासोबत संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक
🔹 फक्त लॉगिन आयडीद्वारे ऑनलाईन नोंदवलेले आक्षेप ग्राह्य धरले जातील
🔹 पत्रव्यवहार किंवा ई-मेलद्वारे आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत

शेवटची तारीख लक्षात ठेवा!

दिनांक 28 मार्च 2025 सायंकाळी 6:00 वाजेपर्यंतच आक्षेप नोंदविता येतील. त्यानंतर कोणतेही आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत.

समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी उमेदवारांनी वेळेत उत्तरतालिका तपासून आवश्यक ते आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन केले आहे.

📢 अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!