11th Admission: नॉन-क्रिमी लेयर व EWS विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट!

Published On: June 3, 2026
Follow Us
11th-admission-2026-ncl-ews-certificate-deadline

राज्यातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत NCL व EWS प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्यात आला असून, Non-Creamy Layer किंवा EWS Certificates सादर करण्यासाठी 3 महिन्याची मुदत मिळाली आहे. मात्र त्यासाठी कॉलेज मध्ये त्यासंबंधीचे पोहोच पावती किंवा हमीपत्र सादर करावे लागणार आहे.

11th Admission NCL EWS Certificates Circuler

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश (11th admission) केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरू असून, सध्या पहिल्या (CAP Round 1) नियमित फेरीतील प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रक्रियेदरम्यान नॉन-क्रिमी लेयर व ईडब्ल्यूएस प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांकडे संबंधित प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्याने प्रमाणपत्र सादर करण्याबाबत मुदत तथा पर्याय उपलब्ध करुन देण्याबाबत विद्यार्थी, पालक व विविध संघटनांकडून विनंती करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, NCL व EWS प्रमाणपत्र अद्याप प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांकडून प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाची पोहोच पावती अथवा हमीपत्र घेऊन त्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देता येणार आहे.

पात्र विद्यार्थ्यांचे केवळ प्रमाणपत्र प्रलंबित असल्यामुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. त्यामुळे प्रवेशानंतर विद्यार्थ्यांना संबंधित प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत अधीनस्थ सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवश्यक सूचना देण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत नॉन-क्रिमी लेयर व ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

FYJC Admission Maharashtra

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026
Safety Audit letter

राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय!

July 18, 2026

Leave a Comment