11th Admission Registration Deadline Extended इयत्ता 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीची मुदत 5 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता 5 जून 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत आपली नोंदणी पूर्ण करू शकतात. यापूर्वी नोंदणीची अंतिम तारीख 3 जून 2025 होती. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी ही माहिती दिली आहे. इन-हाऊस कोटा आणि अल्पसंख्याक कोट्याचे नियम बदलल्यामुळे सदर मुदतवाढ देण्यात आली आहे. कोणते बदल झाले? याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.
11th Admission Registration Deadline Extended
11th Admission Registration Deadline Extended इयत्ता 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीची मुदत 5 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
मुदतवाढीचे कारण: इन-हाऊस कोट्यात बदल
6 मे 2025 च्या शासन निर्णयानुसार असलेल्या काही तरतुदींमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासंबंधी शासनाने 31 मे रोजी नवीन आदेश दिले आहेत. या नवीन आदेशांनुसार:
- खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 10% जागा इन-हाऊस कोट्यासाठी आरक्षित असतील.
- मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या क्षेत्रांसाठी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांची शाळा एक युनिट मानली जाईल.
- राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी त्याच संस्थेची शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय महसुली जिल्ह्यांमध्ये एक युनिट म्हणून इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरले जाईल.
या बदलामुळे कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या संस्थांच्या शाळांमध्ये बदल करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना इन-हाऊस कोट्यातील पसंतीक्रमात बदल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
इन-हाऊस कोटा म्हणजे काय? | In House Quota Meaning in Marathi
इन-हाऊस कोटा म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (जुनियर कॉलेज) त्याच शिक्षण संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवलेल्या जागा. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर एखादी शिक्षण संस्था शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय दोन्ही चालवत असेल, तर त्या शाळेतून 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात विशिष्ट टक्के जागांवर प्राधान्याने प्रवेश मिळतो.
हा कोटा खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 10 टक्के जागांसाठी असतो.
नवीन नियम (शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून लागू):
- खाजगी व्यवस्थापनाच्या संस्थांसाठी:
- खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १०% जागा इन-हाऊस कोट्यासाठी आरक्षित असतील.
- या जागा गुणवत्तेनुसार ऑनलाईन पद्धतीने भरल्या जातील.
- जर उच्च माध्यमिक शाळा त्याच परिसरात/आवारामध्ये माध्यमिक शाळा असेल, तर त्या माध्यमिक शाळेतील उमेदवारांना हा कोटा लागू होईल.
- बिगर-अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक दोन्ही शाळांना इन-हाऊस कोटा लागू असेल.
- सर्वसाधारण नियमित दुसऱ्या फेरीपर्यंत या कोट्यातील जागा भरता येतील.
- त्यानंतरही जागा रिक्त राहिल्यास, त्या जागा परत करणे (surrender) व्यवस्थापनास अनिवार्य असेल.
- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संस्थांसाठी:
- राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इन-हाऊस कोटा ५०% असेल.
- या कोट्यासाठी इयत्ता १० वीची परीक्षा राज्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असतील.
- युनिट ग्राह्य धरण्याबाबत:
- मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे येथील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळांसाठी एक युनिट ग्राह्य धरले जाईल.
- राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी, त्याच संस्थेची शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसुली जिल्ह्यामध्ये एक युनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरले जाईल.
अधिक माहितीसाठी: शासन शुद्धीपत्रक येथे डाउनलोड करा
नोंदणीची सद्यस्थिती
2 जून 2025 पर्यंत सायंकाळपर्यंत, एकूण 10 लाख 85 हजार 851 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात पुणे विभागात 1,87,925; मुंबई विभागात 2,65,900; कोल्हापूर विभागात 1,07,012; छत्रपती संभाजीनगर विभागात 1,00,040; नाशिक विभागात 1,12,108; नागपूर विभागात 95,210; अमरावती विभागात 98,359; लातूर विभागात 58,586 आणि इतर 61,712 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना आवाहन
इयत्ता 11 वी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थी अधिक काळजीपूर्वक माहिती भरू शकतील. यापुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पूर्वी जाहीर केल्याप्रमाणेच राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
अधिक माहितीसाठी विद्यार्थी support@mahafyjcadmissions.in या ई-मेल आयडीवर किंवा 8530955564 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.