महा टीईटी परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर: राज्याचा निकाल ११.२८ टक्के!

Published On: February 3, 2026
Follow Us
Maha TET Result 2026

Maha TET Result 2026: शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून राज्यभरातून लाखो उमेदवारांनी दिलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (MAHATET) अंतिम निकाल अखेर घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी ३ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत संकेतस्थळावर (Maha TET Result 2026) प्रसिद्ध केला आहे.

ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, त्यांना आता परिषदेच्या https://mahatet.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला महा टीईटी रिझल्ट पाहता येईल.

परीक्षेचा टप्पाउपस्थित उमेदवारउत्तीर्ण उमेदवारनिकालाची टक्केवारी
पेपर १ (Paper 1)

(इ. १ ली ते ५ वी)
1,90,90121,89211.47%
पेपर २ (Paper 2)

(गणित व विज्ञान)
95,7828,7379.12%
पेपर २ (Paper 2)

(सामाजिक शास्त्र)
1,60,04719,74012.33%
पेपर २ (Paper 2) – एकूण

(इ. ६ वी ते ८ वी)
2,55,82928,47711.13%
एकूण निकाल (Total Result)4,46,73050,36911.28%

राज्याचा निकाल ११.२८ टक्के!

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २३ नोव्हेंबर २०२५ रोजी ही परीक्षा राज्यभर घेतली होती. परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी आणि उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी परिषदेने १९ डिसेंबर २०२५ रोजी अंतरिम उत्तरसूची (Interim Answer Key) प्रसिद्ध केली होती.

त्यानंतर, उमेदवारांकडून आलेल्या हरकतींचा विचार करून Maha TET Answer key बाबतची पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्राप्त हरकतीनुसार अंतिम उत्तरसूची १२ जानेवारी २०२६ रोजी आणि त्याअनुषंगाने एक शुध्दीपत्रक २ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आले. या सर्व प्रक्रियेनंतर आता अंतिम (Maha TET Result 2026) उमेदवारांसाठी खुला करण्यात आला आहे.

निकालाची ठळक आकडेवारी (Statistics)

Maha TET Result 2026

यंदाचा महा परीक्षा निकाल 2025 पाहिला असता, निकालाची टक्केवारी ही स्पर्धा परीक्षेची काठीण्य पातळी स्पष्ट करणारी आहे. एकूण निकालाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

  • एकूण उमेदवार (उपस्थित): दोन्ही पेपर मिळून एकूण ४,४६,७३० उमेदवार परीक्षेला बसले होते.
  • उत्तीर्ण उमेदवार: त्यापैकी केवळ ५०,३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
  • एकूण निकाल: राज्याचा एकूण निकाल ११.२८ टक्के लागला आहे.

पेपरनिहाय विचार केल्यास, Maha TET Answer key Paper 1 आणि Maha TET Answer key Paper 2 च्या अंतिम तपासणीनंतर खालील चित्र स्पष्ट झाले आहे:

  1. पेपर १ (इयत्ता १ ली ते ५ वी साठी): या पेपरसाठी १,९०,९०१ उमेदवार उपस्थित होते, त्यापैकी २१,८९२ उमेदवार उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ११.४७% आहे.
  2. पेपर २ (इयत्ता ६ वी ते ८ वी साठी): या पेपरसाठी २,५५,८२९ उमेदवार उपस्थित होते, ज्यातून २८,४७७ उमेदवार यशस्वी झाले आहेत. पेपर २ चा एकूण निकाल ११.१३% लागला आहे.

विशेष म्हणजे, पेपर २ मध्ये ‘गणित व विज्ञान’ शाखेचा निकाल ९.१२% तर ‘सामाजिक शास्त्र’ (Social Science) शाखेचा निकाल १२.३३% लागला आहे.

शासन परिपत्रक: राज्यातील या शिक्षकांना आता TET पास व्हावेच लागणार, शिक्षक भरती आणि सेवेबाबत कडक नियम जारी

प्रमाणपत्र वितरण कसे होणार?

ज्या उमेदवारांनी Maha TET Qualifying Marks मिळवून या परीक्षेत यश संपादन केले आहे, त्यांना परीक्षा परिषदेमार्फत प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. पात्र उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्राची प्रत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद आणि मुंबईसाठी शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांच्यामार्फत यथावकाश वितरीत करण्यात येईल, असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

निकाल कसा पाहायचा?

तुमचा (Maha TET Result 2026) पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. mahatet.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. होमपेजवर ‘MAHATET 2025 Result‘ या लिंकवर क्लिक करा.
  3. तुमचा सीट नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरा.
  4. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट काढून ठेवा.

शिक्षक भरती प्रक्रियेतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. उत्तीर्ण झालेल्या सर्व भावी शिक्षकांचे अभिनंदन!

अधिक माहितीसाठी : https://mahatet.in/

प्रसिद्धी पत्रक डाउनलोड करा

Maha TET Result 2026 Notice

TET शिक्षक पात्रता परीक्षा अपडेट्स

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

arogya sevika bharti new gr

आरोग्य सेविका भरतीसाठी मोठा बदल; पात्रता गुणांची मर्यादा 45 वरून 35 टक्के – शासन निर्णय

August 13, 2026
shikshaketar-padbharti-GR

राज्यातील या शाळांमध्ये शिक्षकेतर पदभरतीला शासनाची मंजुरी; 80 टक्के पदे भरता येणार

August 12, 2026
Pavitra Portal Teacher Recruitment

पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ; 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

August 11, 2026
maharojgar melava 2026-27

राज्यात 1 हजार रोजगार मेळावे; युवकांना नोकरीसाठी दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण मिळणार

August 5, 2026
talathi bharti notification 2026

तलाठी पदांच्या 1539 जागांसह MPSC गट क पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध, डाउनलोड डायरेक्ट लिंक

August 3, 2026
public-exam-malpractice-bill-2026

लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2026 मंजूर; पेपरफुटी प्रकरणांत 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

August 2, 2026

Leave a Comment