Maha TET Result 2026: शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून राज्यभरातून लाखो उमेदवारांनी दिलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (MAHATET) अंतिम निकाल अखेर घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी ३ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत संकेतस्थळावर (Maha TET Result 2026) प्रसिद्ध केला आहे.
ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, त्यांना आता परिषदेच्या https://mahatet.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला महा टीईटी रिझल्ट पाहता येईल.
| परीक्षेचा टप्पा | उपस्थित उमेदवार | उत्तीर्ण उमेदवार | निकालाची टक्केवारी |
| पेपर १ (Paper 1) (इ. १ ली ते ५ वी) | 1,90,901 | 21,892 | 11.47% |
| पेपर २ (Paper 2) (गणित व विज्ञान) | 95,782 | 8,737 | 9.12% |
| पेपर २ (Paper 2) (सामाजिक शास्त्र) | 1,60,047 | 19,740 | 12.33% |
| पेपर २ (Paper 2) – एकूण (इ. ६ वी ते ८ वी) | 2,55,829 | 28,477 | 11.13% |
| एकूण निकाल (Total Result) | 4,46,730 | 50,369 | 11.28% |
राज्याचा निकाल ११.२८ टक्के!
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २३ नोव्हेंबर २०२५ रोजी ही परीक्षा राज्यभर घेतली होती. परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी आणि उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी परिषदेने १९ डिसेंबर २०२५ रोजी अंतरिम उत्तरसूची (Interim Answer Key) प्रसिद्ध केली होती.
त्यानंतर, उमेदवारांकडून आलेल्या हरकतींचा विचार करून Maha TET Answer key बाबतची पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्राप्त हरकतीनुसार अंतिम उत्तरसूची १२ जानेवारी २०२६ रोजी आणि त्याअनुषंगाने एक शुध्दीपत्रक २ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आले. या सर्व प्रक्रियेनंतर आता अंतिम (Maha TET Result 2026) उमेदवारांसाठी खुला करण्यात आला आहे.
निकालाची ठळक आकडेवारी (Statistics)

यंदाचा महा परीक्षा निकाल 2025 पाहिला असता, निकालाची टक्केवारी ही स्पर्धा परीक्षेची काठीण्य पातळी स्पष्ट करणारी आहे. एकूण निकालाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
- एकूण उमेदवार (उपस्थित): दोन्ही पेपर मिळून एकूण ४,४६,७३० उमेदवार परीक्षेला बसले होते.
- उत्तीर्ण उमेदवार: त्यापैकी केवळ ५०,३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
- एकूण निकाल: राज्याचा एकूण निकाल ११.२८ टक्के लागला आहे.
पेपरनिहाय विचार केल्यास, Maha TET Answer key Paper 1 आणि Maha TET Answer key Paper 2 च्या अंतिम तपासणीनंतर खालील चित्र स्पष्ट झाले आहे:
- पेपर १ (इयत्ता १ ली ते ५ वी साठी): या पेपरसाठी १,९०,९०१ उमेदवार उपस्थित होते, त्यापैकी २१,८९२ उमेदवार उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ११.४७% आहे.
- पेपर २ (इयत्ता ६ वी ते ८ वी साठी): या पेपरसाठी २,५५,८२९ उमेदवार उपस्थित होते, ज्यातून २८,४७७ उमेदवार यशस्वी झाले आहेत. पेपर २ चा एकूण निकाल ११.१३% लागला आहे.
विशेष म्हणजे, पेपर २ मध्ये ‘गणित व विज्ञान’ शाखेचा निकाल ९.१२% तर ‘सामाजिक शास्त्र’ (Social Science) शाखेचा निकाल १२.३३% लागला आहे.
प्रमाणपत्र वितरण कसे होणार?
ज्या उमेदवारांनी Maha TET Qualifying Marks मिळवून या परीक्षेत यश संपादन केले आहे, त्यांना परीक्षा परिषदेमार्फत प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. पात्र उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्राची प्रत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद आणि मुंबईसाठी शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांच्यामार्फत यथावकाश वितरीत करण्यात येईल, असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
निकाल कसा पाहायचा?
तुमचा (Maha TET Result 2026) पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
mahatet.inया अधिकृत वेबसाईटला भेट द्या.- होमपेजवर ‘MAHATET 2025 Result‘ या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा सीट नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट काढून ठेवा.
शिक्षक भरती प्रक्रियेतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. उत्तीर्ण झालेल्या सर्व भावी शिक्षकांचे अभिनंदन!
अधिक माहितीसाठी : https://mahatet.in/








