आरोग्य विभागाचा मोठा निर्णय! अंशकालीन स्त्री परिचर यांच्या मानधनात दुप्पट वाढ

Published On: March 19, 2026
Follow Us
Anshkalin Stri Parichar Mandhan Vadh

राज्यातील अंशकालीन स्त्री परिचरांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक १७ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. वाढीव मानधन १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे.

मानधनात ३ हजार रुपयांची दुप्पट वाढ

सार्वजनिक आरोग्य विभागाने अंशकालीन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात महत्त्वपूर्ण वाढ करत मोठा दिलासा दिला आहे. आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचर गाव पातळीवर, आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागात प्राथमिक स्वरुपाच्या आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात.

तसेच आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यातही स्त्री परिचर महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या कामाचे स्वरुप पाहता त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व संघटनाकडूनही होत होती.

यापूर्वी २०१९ च्या शासन निर्णयानुसार त्यांना दरमहा ३,००० रुपये मानधन मिळत होते. आता त्यात आणखी ३,००० रुपयांची वाढ करण्यात आली असून एकूण मानधन ६,००० रुपये करण्यात आले आहे. त्यांच्या कामाचे वाढते स्वरूप, ग्रामीण व दुर्गम भागातील जबाबदाऱ्या आणि महागाईचा विचार करून ही दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

या तारखेपासून वाढीव मानधन लागू होणार

अंशकालीन स्त्री परिचरांना वाढीव मानधन १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने अधिकृतपणे जारी केला असून त्यानुसार राज्यभरातील सर्व आरोग्य उपकेंद्रांमध्ये कार्यरत स्त्री परिचरांना सुधारित मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरमहा १० तारखेपर्यंत मानधन देण्याचे जिल्हा परिषदांना निर्देश

सुधारित मानधन वेळेवर मिळावे यासाठी शासनाने सर्व जिल्हा परिषदांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार अंशकालीन स्त्री परिचरांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत मानधन अदा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे मानधन वितरणात होणारा विलंब टाळून स्त्री परिचरांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे.

अधिक माहितीसाठी: सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय डाउनलोड करा

शासन निर्णय

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Anukampa Niyukati Prastav

अनुकंपा नियुक्तीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

August 14, 2026
retirement-after-government-residence-child-education-maharashtra-gr

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय! पाल्याच्या शिक्षणासाठी शासनाने दिली मोठी सवलत

August 14, 2026
aasha gatparvartak meeting 2026

राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न; बैठकीतील ठळक मुद्दे

August 12, 2026
arogya-vibhag-badli-new-policy-gr-2026

आरोग्य विभाग बदली धोरणात मोठा बदल! गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांना आता विनंती बदलीसाठी नवीन तरतूद

August 11, 2026
arogya vibhag employee latest update

NHM कर्मचारी समायोजन, रिक्त पदभरती आणि पदोन्नतीला गती देण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
public-health-department-state-training-policy-maharashtra-2026

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागासाठी नवीन राज्य प्रशिक्षण धोरण; सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण बंधनकारक

August 8, 2026

Leave a Comment