महत्वाची अपडेट! 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती निकाल जाहीर, आता गुणपडताळणी व नावातील दुरुस्ती, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती पाहा

Published On: May 19, 2026
Follow Us
MSCE Pune Scholarship Result Mark Verification

MSCE Pune Scholarship Result Mark Verification: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (msce pune) यांच्या वतीने २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) परीक्षेचा (puppss) निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता गुणांच्या पडताळणीची ऑनलाईन प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

निकाल ऑनलाईन कसा आणि कुठे पाहायचा?

परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in किंवा https://puppssmsce.in तसेच https://2026.puppssmsce.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. पालक थेट या संकेतस्थळावर जाऊन आपल्या पाल्याचा निकाल पाहू शकतात, तर शाळांना त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल स्वतःच्या लॉगीनमधून एकत्र पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे. निकाल पाहिल्यानंतर जर विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांबाबत काही शंका असेल, तर ते गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकतात.

गुणांच्या पडताळणीची ऑनलाईन प्रक्रिया (MSCE Pune Scholarship Result Mark Verification)

निकालात मिळालेल्या गुणांबाबत खात्री करायची असल्यास, विद्यार्थी त्यांच्या शाळेमार्फत गुणांच्या पडताळणीसाठी (MSCE Pune Scholarship Result Mark Verification) अर्ज करू शकतात.

MSCE Pune Scholarship Result Mark Verification Circuler

ही प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन असून, १८ मे ते २७ मे २०२६ या कालावधीत संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये यासाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

MSCE Pune Scholarship Result Mark Verification online

गुणपडताळणीसाठी प्रति पेपर ५० रुपये इतके शुल्क निश्चित करण्यात आले असून, हे शुल्क ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे अनिवार्य आहे. ऑफलाईन किंवा इतर कोणत्याही मार्गाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

ऑनलाईन अर्ज अधिकृत लिंक : https://2026.puppssmsce.in/school/login

अर्जातील चुका आणि माहितीत दुरुस्ती कशी करावी?

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये बऱ्याचदा अर्ज भरताना नावात स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते. या प्रकारच्या दुरुस्तीसाठी देखील २७ मे २०२६ पर्यंत शाळेच्या लॉगीनमधून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

याशिवाय, शाळेचे क्षेत्र म्हणजेच शाळा शहरी किंवा ग्रामीण भागात येते याबाबत, तसेच अभ्यासक्रमात काही दुरुस्ती करायची असल्यास त्याची एक वेगळी पद्धत आहे. यासाठी मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे सविस्तर विनंती पत्र तयार करून ते puppsshelpdesk@gmail.com या ईमेल आयडीवर २७ मे २०२६ पर्यंत पाठवणे आवश्यक आहे.

अंतिम निकाल कधी लागणार?

विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह शाळेच्या लॉगीनमधून प्राप्त झालेल्या गुणपडताळणी (MSCE Pune Scholarship Result Mark Verification) अर्जांवर ३० दिवसांच्या आत निर्णय घेऊन तो शाळेच्या लॉगीनमध्येच कळवला जाईल.

हे सर्व गुणपडताळणीचे अर्ज निकाली काढल्यानंतरच विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी आणि निकाल प्रसिद्ध केला जाईल. त्यामुळे ज्यांना गुणांबाबत शंका आहे, त्यांनी वेळेत आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून पुढील कार्यवाही पूर्ण करावी.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : http://www.mscepune.in/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment