मंत्रिमंडळ निर्णय! कंत्राटी विधी अधिकारी यांच्या मानधनात 25 हजार रुपयांची भरघोस वाढ Cabinet Decisions

Published On: April 22, 2025
Follow Us
Cabinet Decisions

Cabinet Decisions मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 22 एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

Cabinet Decisions मंत्रिमंडळ निर्णय!

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त
(मंगळवार, दि. 22 एप्रिल 2025)
एकूण निर्णय- 8

ग्रामविकास विभाग
मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय. स्मारकासाठी 142.60 कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67.17 लाख रुपयांच्या तरतूदीस मंजूरी.

जलसंपदा विभाग
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ता. पवनी, जि.भंडारा या प्रकल्पाच्या 25 हजार 972 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतूदीस सुधारित प्रशासकीय मान्यता.

कामगार विभाग
राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करणार

महसूल विभाग
विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त कंत्राटी विधी अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय, 35 हजार रुपयां ऐवजी 50 हजार रुपये मानधन मिळणार.

राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांतील कंत्राटी विधि अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी तत्वावर विधि अधिकारी नियुक्त करण्यात येतात. या अधिकाऱ्यांना सध्या एकत्रितरित्या पस्तीस हजार रुपये मानधन देण्यात येते. हे मानधन कमी असून, ते वाढविण्याबाबत विधि अधिकाऱ्यांकडून निवेदन देण्यात आले होते. त्यांच्या मागणीचा विचार करून दरमहा पंचेचाळीस हजार रुपये मानधन आणि दूरध्वनी आणि प्रवास खर्चापोटी पाच हजार रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे या विधि अधिकाऱ्यांना 50 हजार रुपये मानधन मिळणार आहे.

विधी व न्याय विभाग
14 व्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरुपात स्थापन करण्यात आलेल्या 16 अतिरिक्त न्यायालयांना व 23 जलदगती न्यायालयांना आणखी 2 वर्षे मुदतवाढ देण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता.

मत्स्यव्यवसाय विभाग
मत्स्यव्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रा सारखाच दर्जा देण्याचा निर्णय. मच्छिमारी, मत्स्य व्यावसायसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, सवलतीचा लाभ होणार.

गृहनिर्माण विभाग
पायाभूत सुविधांच्या अमंलबजावणीत बाधित झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मिती व त्यांच्या वितरणासाठीच्या धोरणात सुधारणा

सार्वजनिक बांधकाम विभाग
पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण यावर चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर यावर जमिनीस समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय

मंत्रिमंडळ निर्णय: या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन निश्चित तर सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत ‘आश्वासित प्रगती योजना’ लागू करण्याचा निर्णय!

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

samagra-shiksha-abhiyan-maharashtra-future-plan-guidelines-2026

‘समग्र शिक्षा’ योजनेच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

April 5, 2026
NHM Contractual Employees Services

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू – मंत्री प्रकाश आबिटकर

March 23, 2026
Contractual Health Workers Regularization

राज्यातील या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेणार का? सरकारकडून मोठा खुलासा!

March 23, 2026
PMMVY Contractual Employees Regularization

PMMVY योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय आरोग्य योजनेत समायोजन करण्याबाबत – तारांकित प्रश्न

March 12, 2026
samagra-shiksha-contract-employee-regularization

एकच नारा – शासन सेवेत कायम करा! समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी पुन्हा आझाद मैदनावर

March 9, 2026
PMGSY Contract Employees Regularization

PMGSY कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ आणि शासन सेवेत समायोजन बाबत सरकारकडून स्पष्टीकरण – तारांकित प्रश्न

March 6, 2026

Leave a Comment