राज्यातील कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ; शासन निर्णय जारी Contractual Officers Increase Remuneration

Published On: April 25, 2025
Follow Us
Contractual Officers Increase Remuneration

Contractual Officers Increase Remuneration महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये नेमलेल्या कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या मानधनात 10 हजार रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचा सविस्तर शासन निर्णय दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

Contractual Officers Increase Remuneration

राज्यातील ६ विभागीय आयुक्त कार्यालये आणि 35 जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सध्या एकूण ४१ कंत्राटी विधी अधिकारी कार्यरत आहेत. हे अधिकारी विविध न्यायालयीन प्रकरणांसाठी शासकीय कामकाजात मदत करतात. त्यांच्या कामाच्या महत्त्वाला ओळखून शासनाने त्यांचे दरमहा मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन निर्णयानुसार, आता कंत्राटी विधी अधिकाऱ्यांना दरमहा ४५,००० रुपये मानधन मिळेल. यासोबतच प्रवास आणि दूरसंचार खर्चासाठी ५,००० रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत. त्यामुळे एकूण मिळणारी रक्कम ५०,००० रुपये इतकी होणार आहे. याआधी हे मानधन दरमहा ३५,००० रुपये होते.

ही वाढ दिनांक २५ एप्रिल २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. यासाठी लागणारा निधी “मानवी हक्क संरक्षण व लोकशाहीशक्तीचा विकास” या योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या लेखाशाखांना वितरित केला जाणार आहे.

हे ही वाचा: राज्यातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी! किमान वेतनात मोठी वाढ

कंत्राटी विधि अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्यास मंत्रिमंडळाच्या दिनांक २२ एप्रिल रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार दिनांक २५ एप्रिल रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आली आहे.

मानधन वाढीचा शासन निर्णय येथे डाउनलोड करा

या निर्णयामुळे कंत्राटी विधी अधिकाऱ्यांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळणार आहे आणि न्यायालयीन कामकाज अधिक गतीने व प्रभावीपणे पार पडेल, असा शासनाचा विश्वास आहे.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

samagra-shiksha-abhiyan-maharashtra-future-plan-guidelines-2026

‘समग्र शिक्षा’ योजनेच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

April 5, 2026
NHM Contractual Employees Services

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू – मंत्री प्रकाश आबिटकर

March 23, 2026
Contractual Health Workers Regularization

राज्यातील या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेणार का? सरकारकडून मोठा खुलासा!

March 23, 2026
PMMVY Contractual Employees Regularization

PMMVY योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय आरोग्य योजनेत समायोजन करण्याबाबत – तारांकित प्रश्न

March 12, 2026
samagra-shiksha-contract-employee-regularization

एकच नारा – शासन सेवेत कायम करा! समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी पुन्हा आझाद मैदनावर

March 9, 2026
PMGSY Contract Employees Regularization

PMGSY कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ आणि शासन सेवेत समायोजन बाबत सरकारकडून स्पष्टीकरण – तारांकित प्रश्न

March 6, 2026

Leave a Comment