Barti UPSC MPSC Registration महाराष्ट्र शासनाच्या बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था), टीआरटीआय, सारथी, महाज्योती आणि आर्टी या पाच संस्थांनी एकत्रितपणे स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागवले आहेत. या संस्थांच्या लाभार्थी गटातील युवक-युवतींसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या सर्वंकष धोरणांतर्गत, यूपीएससी नागरी सेवा (दिल्ली), महाराष्ट्र राज्य यूपीएससी नागरी सेवा, महाराष्ट्र राज्यसेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, आणि महाराष्ट्र न्यायिक सेवा या परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड सामायिक प्रवेश परीक्षा (CET) आणि गुणांकन पद्धतीद्वारे केली जाईल. उमेदवारांची अंतिम निवड त्यांची शैक्षणिक पात्रता, आरक्षणाचे नियम आणि सीईटीमधील गुण यावर आधारित असेल. ही निवड प्रक्रिया स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संनियंत्रण व अंमलबजावणी समितीमार्फत पूर्ण केली जाईल.
बार्टी संस्थेतर्फे अनुसूचित जाती (SC) मधील विद्यार्थ्यांसाठी खासगी नामांकित प्रशिक्षण संस्थांमधून हे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणाद्वारे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवून त्यांचा आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न आहे.
या योजनेबद्दलची अधिक माहिती, शासन निर्णय, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्यासाठीची लिंक बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर http://barti.maharashtra.gov.in उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी केवळ याच संकेतस्थळावरील लिंकचा वापर करून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.



