Mahajyoti Tab Registration Last Date: JEE, NEET, MHT-CET परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Published On: August 10, 2025
Follow Us
Mahajyoti Tab Registration Last Date

Mahajyoti Tab Registration Last Date महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर यांच्या अंतर्गत ‘महाज्योती’ तर्फे JEE/NEET/MHT-CET 2025-27 परीक्षांसाठी ऑनलाइन पूर्व-प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

महाज्योतीमार्फत JEE, NEET आणि MHT-CET या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 18 महिन्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार असून, पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि दररोज 6 जीबी इंटरनेट सेवा देखील पुरवली जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 पर्यंत वाढविण्यात आली होती. परंतु, 11वी विज्ञान शाखेत प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली. विद्यार्थ्यांची ही विनंती मान्य करून अर्ज करण्याची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे.

आता, या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 आहे. याव्यतिरिक्त, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच अर्ज केला आहे, त्यांना आवश्यक कागदपत्रे, जसे की वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रकल्प व्यवस्थापक विकास गडपायले यांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थी महाज्योतीच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

अधिक माहितीसाठी : मुदतवाढ परिपत्रक वाचा

mahajyoti tab circuler

महाज्योती योजना

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026
Safety Audit letter

राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय!

July 18, 2026

Leave a Comment