Increase in Medical Allowance: राज्यातील आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद, मुंबई येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी मिळणारा वार्षिक भत्ता वाढवण्यात आला आहे.
वैद्यकीय भत्त्यात वाढ
पूर्वी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारांसाठी प्रतिवर्षी १५,०००/- रुपये भत्ता मिळत होता. परंतु, वैद्यकीय खर्च वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांना हा भत्ता अपुरा पडत होता. त्यामुळे शासनाने कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन वैद्यकीय भत्त्याची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला.
आता, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेतील (Maharashtra Homeopathy Council) कर्मचाऱ्यांना वार्षिक ३०,०००/- रुपये वैद्यकीय भत्ता मिळणार आहे. ही वाढ सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षापासून लागू होईल.
अधिक माहितीसाठी: शासन निर्णय वाचा

