MahaDBT 2.0: शिशुवर्ग ते बारावी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘महाशिष्यवृत्ती’ प्रणाली लागू, अर्ज प्रक्रियेत झाले ‘हे’ 5 मोठे बदल

Published On: June 3, 2026
Follow Us
MahaDBT Divyang Scholarship

MahaDBT 2.0 राज्य शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने शिशुवर्ग ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांची प्रक्रिया आता अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘महाशिष्यवृत्ती‘ ही नवीन एकात्मिक संगणकीय प्रणाली सुरू केली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या सर्व योजना (Pre-Matric Scholarship) आता ‘MahaDBT 2.0‘ पोर्टलवरून राबविल्या जाणार आहेत. एकाच डिजिटल मंचावर सर्व योजना उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना आपल्या पात्रतेनुसार योग्य योजनेची निवड करणे आता खूप सोपे जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्णय दिनांक २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. डाउनलोड लिंक खाली दिलेली दिली आहे.

या पूर्वीच्या ऑनलाईन शिष्यवृत्ती प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांना अर्ज करताना तब्बल ६४ पेक्षा अधिक रकान्यांमध्ये (Fields) माहिती भरावी लागत होती, परंतु नवीन बदलांनुसार ही संख्या कमी करून केवळ ३१ क्षेत्रांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे.

तसेच विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा कागदपत्रे आणि माहिती सादर करावी लागू नये यासाठी आधार आणि युडायस (UDISE) यांसारख्या शासकीय डेटाबेसमधून विद्यार्थ्यांची माहिती आपोआप (Auto-Fetch) घेतली जाणार आहे. यामुळे (MahaDBT 2.0 Scholarship) मिळवण्यासाठी अर्ज भरताना होणारा त्रास कमी होऊन अर्जांमधील त्रुटींचे प्रमाणही लक्षणीयरीत्या घटणार आहे.

शिष्यवृत्तीचे नूतनीकरण (Renewal) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही मोठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘Pre-filled Renewal Application’ मुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी संपूर्ण अर्ज नव्याने भरण्याची गरज भासणार नाही; त्यांना केवळ शाळेचे चालू वर्षाचे शुल्क आणि इतर आवश्यक तीच बदललेली माहिती अद्ययावत करावी लागेल.

यासोबतच, उत्पन्नावर आधारित योजनांसाठी पहिल्या वर्षी सादर केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र आता विद्यार्थ्याच्या स्वयंघोषणापत्राच्या (Self Declaration) आधारे संपूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी ग्राह्य धरले जाईल. अर्जाच्या मंजुरीला होणारा विलंब टाळण्यासाठी विद्यमान तीन-स्तरीय छाननी यंत्रणा सुलभ करून ती आता सरासरी दोन स्तरांपर्यंतच मर्यादित करण्यात आली आहे.

मंजूर झालेली शिष्यवृत्तीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाणार आहे. विद्यार्थ्याला स्वतःच्या अर्जाची सद्यस्थिती (Status) वेळोवेळी ऑनलाईन तपासण्याची सुविधाही या प्रणालीत देण्यात आली आहे.

शिशुवर्ग ते बारावीपर्यंतच्या शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत झाले ‘हे’ ५ मोठे बदल

शिष्यवृत्तीच्या अर्ज प्रक्रियेत (Application Process) झालेले ५ मुख्य बदल थोडक्यात खालीलप्रमाणे आहेत.

१. रकाने कमी झाले: अर्जात पूर्वी ६४ रकाने भरावे लागायचे, ते आता कमी करून केवळ ३१ करण्यात आले आहेत.

२. माहिती आपोआप येईल: आधार आणि युडायसवरून विद्यार्थ्यांची माहिती आपोआप (Auto-Fetch) घेतली जाईल, त्यामुळे वारंवार कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत.

३. जलद मंजुरी: अर्जाची छाननी आता ३ स्तरांऐवजी केवळ २ स्तरांवर होईल.

४. सोपे नूतनीकरण: नूतनीकरणासाठी (Renewal) जुनी माहिती आधीच भरलेली असेल, फक्त चालू वर्षाची फी आणि आवश्यक बदलच अपडेट करावे लागतील.

५. उत्पन्नाचा दाखला: पहिल्या वर्षी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र स्वयंघोषणापत्राच्या आधारे संपूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी ग्राह्य धरले जाईल, दरवर्षी नवीन दाखला काढावा लागणार नाही.

नवीन (Divyang Scholarship) प्रणाली लागू झाली असली तरी, मूळ शासन निर्णयामध्ये ठरवून दिलेल्या अटी, शर्ती, पात्रता निकष आणि आर्थिक मर्यादा या पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहेत. या प्रणालीमार्फत अर्ज कसा करावा याबद्दलचे सविस्तर युजर मॅन्युअल आणि अर्जाचा नमुना शासनाच्या www.mahadbt2.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महाशिष्यवृत्तीअधिकृत वेबसाईट
शासन निर्णयडाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026
Safety Audit letter

राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय!

July 18, 2026

Leave a Comment