MSCE Scholarship Exam 2026 Answer Key Cut off Direct Link

Published On: May 7, 2026
Follow Us
MSCE Scholarship Exam 2026 Answer Key Cut off Direct Link

MSCE Scholarship Exam 2026 Answer Key: प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7. वी) ही दि. 26/04/2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पार पडली आहे. आता या PSE व UPS या शिष्यवृत्ती परीक्षेची MSCE Scholarship Exam 2026 Answer Key https://mscepune.in/https://2026-2.puppssmsce.in/ या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध केली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी Cut off निवडीचे निकष काय आहेत? सविस्तर पाहूया.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCE) घेतल्या जाणाऱ्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक मुख्य प्रश्न पडतो, तो म्हणजे ‘कट ऑफ’ आणि त्यातील अटींचा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याद्वारे राबवल्या जाणाऱ्या या प्रक्रियेत केवळ पात्र होणे पुरेसे नसते, तर शिष्यवृत्ती संचाच्या मर्यादेत येणे आवश्यक असते.

शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २६ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध केली आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट असून, याद्वारे परीक्षेतील गुणांचा अंदाज घेणे आता सोपे झाले आहे. ही उत्तरसूची परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यावर हरकती नोंदवण्यासाठी विशिष्ट कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

जर कोणत्याही प्रश्नाबद्दल किंवा उत्तराबाबत आक्षेप असेल, तर तो नोंदवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळांना त्यांच्या लॉगिनद्वारे तर पालकांना संकेतस्थळावरील विशिष्ट लिंकवरून ७ मे ते १४ मे २०२६ या कालावधीत आपले आक्षेप नोंदवता येतील.

विशेष म्हणजे, ईमेल किंवा टपालाद्वारे पाठवलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, त्यामुळे दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीनेच प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. एकदा मुदत संपल्यानंतर कोणत्याही निवेदनावर विचार केला जाणार नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.

उत्तरसूचीसोबतच विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची संधीही परिषदेने उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, जात प्रवर्ग किंवा शाळेची माहिती यामध्ये काही चुका झाल्या असल्यास, शाळांना त्यांच्या लॉगिनमधून या दुरुस्त्या सुचवता येतील. यासाठी देखील १४ मे २०२६ हीच अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

या प्रक्रियेनंतर विषय तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केली जाईल, ज्याच्या आधारावर परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे सर्व संबंधितांनी वेळेत आपली माहिती तपासून घेणे हिताचे ठरेल.

शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची

MSCE Scholarship Exam 2026 Cut off आणि निवड प्रक्रियेचे नियम

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागल्यानंतर शासनमान्य मंजूर संचांनुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अनेकदा असे घडते की, कट ऑफ गुणांइतकेच गुण एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळतात. अशा वेळी सर्वच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेलच असे नाही, कारण शिष्यवृत्ती संच मर्यादित असतात. या गोंधळावर मात करण्यासाठी परीक्षा परिषदेने काही विशेष निकष किंवा प्राधान्यक्रम ठरवून दिले आहेत.

जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना MSCE Scholarship Exam 2026 Cut off इतकेच समान गुण मिळतात, तेव्हा सर्वात आधी पेपर क्रमांक २ (तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी) मधील गुण तपासले जातात.

ज्या विद्यार्थ्याला या पेपरमध्ये जास्त गुण असतील, त्याला निवडीत प्राधान्य दिले जाते. जर या पेपरमध्येही गुण समान असतील, तर विद्यार्थ्याचे वय विचारात घेतले जाते. ज्या विद्यार्थ्याचे वय जास्त आहे, त्याला या प्रक्रियेत पहिले स्थान मिळते.

अगदी शेवटचा पर्याय म्हणून, जर गुण आणि वय दोन्ही सारखेच असेल, तर विद्यार्थ्याच्या नावाच्या आद्याक्षराचा (A to Z) विचार करून अंतिम निवड केली जाते. त्यामुळे MSCE Scholarship Exam 2026 Cut off च्या यादीत नाव येण्यासाठी केवळ एकूण गुणच नाही, तर विषयानुसार गुण आणि वयाचे निकषही तितकेच महत्त्वाचे ठरतात. विद्यार्थ्यांनी तयारी करताना पेपर २ वर विशेष लक्ष दिल्यास, समान गुण सुटण्याच्या स्थितीत त्यांना फायदा होऊ शकतो.

अधिक माहितीसाठी कट ऑफ अधिकृत निकष PDF डाउनलोड करा

शिष्यवृत्तीची रक्कम आणि कालावधी किती सविस्तर वाचा

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष

MSCE PSE Scholarship 2026 Nikash

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष डाउनलोड pdf

PUS शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष

PUS शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष डाउनलोड pdf

अधिक माहितीसाठी MSCE Scholarship Exam 2026 Answer Key Cut off Direct Link : https://mscepune.in/https://2026-2.puppssmsce.in/

MSCE Scholarship Exam 2026 ALL Question Paper

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment