राज्यातील CRP, सखी आणि प्रेरिकांसाठी वाढीव मानधन मंजूर, शासन निर्णय निर्गमित

Published On: March 24, 2026
Follow Us
MSRLM CRP Honorarium Increase gr

CRP Honorarium Increase Maharashtra : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने समुदाय संसाधन व्यक्ती (CRP), प्रेरिका (ICRP) आणि सखी यांच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक वाढीव मानधन निधी वितरीत करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 23 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

MSRLM अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे वाढीव मानधन मंजूर

राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत काम करणाऱ्या CRP, ICRP आणि सखी यांना वाढीव मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून दरमहा कमाल ₹6000 पर्यंत मानधन देण्याची तरतूद आहे.

हा निर्णय ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आणि स्वयं सहायता गटांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी घेतला गेला आहे.

स्वयं सहायता गटांसाठी निधी वाढ

या निर्णयात फक्त मानधन वाढच नाही, तर स्वयं सहायता गटांना (SHG) दिल्या जाणाऱ्या फिरत्या निधीत (Revolving Fund) देखील वाढ करण्यात आली आहे.

“अ” वर्गातील गटांना ₹30,000 पर्यंत निधी तर “ब” आणि “क” वर्गातील गटांना पूर्वीप्रमाणे निधी
यामुळे गटांच्या आर्थिक क्षमतेत वाढ होणार ही वाढ केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आली आहे.

18.40 कोटी निधी वितरित

सन 2025-26 साठी शासनाने एकूण ₹16,500 लाखांची तरतूद केली होती. त्यापैकी मोठा हिस्सा आधीच वितरित करण्यात आला होता. उर्वरित निधीतून आता फेब्रुवारी आणि मार्च 2026 साठी ₹18,40,48,000 इतका निधी मंजूर BDS प्रणालीद्वारे थेट MSRLM ला वितरित करण्यात आला आहे.

शासनाने सदर निधी खर्च करणेसाठी हा निधी फक्त मंजूर उद्देशासाठीच वापरावा. अन्य वापर केल्यास तो आर्थिक अनियमितता मानला जाईल. तसेच निधी काढल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती संबंधित विभागाला देणे आवश्यक आहे. असे शासन निर्णयात स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

अधिक माहितीसाठी: MSRLM अंतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती (CRP), प्रेरिका (ICRP) आणि सखी यांचे वाढीव मानधन शासन निर्णय डाउनलोड करा

शासन निर्णय

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Anukampa Niyukati Prastav

अनुकंपा नियुक्तीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

August 14, 2026
retirement-after-government-residence-child-education-maharashtra-gr

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय! पाल्याच्या शिक्षणासाठी शासनाने दिली मोठी सवलत

August 14, 2026
aasha gatparvartak meeting 2026

राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न; बैठकीतील ठळक मुद्दे

August 12, 2026
arogya-vibhag-badli-new-policy-gr-2026

आरोग्य विभाग बदली धोरणात मोठा बदल! गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांना आता विनंती बदलीसाठी नवीन तरतूद

August 11, 2026
arogya vibhag employee latest update

NHM कर्मचारी समायोजन, रिक्त पदभरती आणि पदोन्नतीला गती देण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
public-health-department-state-training-policy-maharashtra-2026

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागासाठी नवीन राज्य प्रशिक्षण धोरण; सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण बंधनकारक

August 8, 2026

Leave a Comment