Pashusamvardhan Vibhag Bharati Update राज्यात मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे व बदली पात्र कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या यामुळे राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा व बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त या संवर्गातील बदल्या समुपदेशनाने करण्याचा ऐतिहासिक निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. तसेच पशुसंवर्धन विभागात 3 हजारांहून अधिक पदे रिक्त असून ही पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे. सविस्तर पाहूया.
पारदर्शक कारभार ; पसंतीनुसार बदल्या
पशुसंवर्धन विभागातील मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे व बदली पात्र कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या यामुळे राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा, यासाठी पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या संवर्गातील प्राधान्याने भरावयाची पदे निश्चित करण्यात आली आहेत.
या पदांवर बदलीने पदस्थापना करण्यासाठी बदलीपात्र अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली देण्यासाठी समुपदेशनाची कार्यपद्धती अवलंबण्यात येणार आहे. त्याद्वारे बदलीपात्र अधिकाऱ्यांना प्राधान्यक्रम व जेष्ठतेनुसार उपलब्ध पदांमधून त्यांच्या पसंतीचे ठिकाण निवडण्याची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
समुपदेशनाने बदलीची कार्यपद्धती पार पाडताना ती पारदर्शकपणे पार पाडली जाईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यामध्ये बदलीसाठी निर्धारित करण्यात आलेली पदे, दिव्यांग, गंभीर आजार असलेले कर्मचारी, असक्षम पाल्य, विधवा किंवा परित्यक्ता असलेल्या महिला, पती-पत्नी एकत्रिकरण अशी वर्गवारी करण्यात आली आहे.
समुपदेशनाने बदल्यांची कार्यवाही १५ व १६ मे २०२५ रोजी आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान सुमारे ६५० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.
जेष्ठता यादी व बदलीसाठी उपलब्ध पदे यांची यादी उपलब्ध
बदलीपात्र अधिकाऱ्यांची वर्गवारीनिहाय जेष्ठता यादी व बदलीसाठी उपलब्ध पदे यांची यादी विभागाच्या पशुसंवर्धन संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याची लिंक सर्व संबंधित अधिकाऱ्यांनाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर वर्गवारीतील जेष्ठ अधिकाऱ्यांस बदलीचे ठिकाण निवडण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
Pashusamvardhan Vibhag Bharati Update
Pashusamvardhan Vibhag Bharati Update पशुसंवर्धन विभागात 3 हजारांहून अधिक पदे रिक्त – भरती प्रक्रियेची तयारी सुरू
पशुसंवर्धन विभागातील मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे व बदली पात्र कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या यामुळे राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा, यासाठी पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या संवर्गातील प्राधान्याने भरावयाची पदे निश्चित करण्यात आली आहेत.
विभागाच्या पुनर्रचनेनंतर काही नवीन पदांची निर्मिती झाली असून, आधीपासूनच रिक्त असलेल्या पदांमुळे विभागातील एकूण रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
ही रिक्त पदे लक्षात घेता, विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) 3,000 पेक्षा जास्त पदांसाठी मागणीपत्र सादर केले आहे. त्यामुळे लवकरच या पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.