Tirtha Darshan Yojana: महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना‘ राबविण्यास मान्यता देण्यात आली असून, यामध्ये राज्यातील 66 तर भारतातील 73 तीर्थक्षेत्रांना मोफत तीर्थ दर्शन यात्रा करता येणार आहे, याबाबतचा शासन निर्णय दिनांक 14 जुलै 2024 रोजी जारी करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रात पैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे.
तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास. भोजन. निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. लाभार्थी वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार असावे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व वय वर्ष 60 वरील ज्येष्ठ नागरिक असावा. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज (Online application) सादर करावे लागणार आहेत.
राज्यातील 66 तर भारतातील 73 तीर्थक्षेत्रांना मोफत तीर्थ दर्शन यात्रा करता येणार
सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्यातील 66 तर भारतातील 73 तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” (Mukhyamantri Tirtha Darshan Yojana) सुरु करण्यात आली आहे.
लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती, सविस्तर तपशील जाणून घ्या..
भारतातील या तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता येणार
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत खालील 73 विविध तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता येणार आहे.
महाराष्ट्रातील या तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता येणार
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत खालील 66 विविध तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता येणार आहे.
अधिक माहितीसाठी : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासन निर्णय पाहा