Post Office GDS 3rd Merit Cut Off List 2026 Download Here

Published On: May 17, 2026
Follow Us
Post Office GDS 3rd Merit Cut Off List 2026 Download Here

Post Office GDS 3rd Merit List 2026: भारतीय डाक विभागाने जानेवारी २०२६ च्या शेड्युल अंतर्गत महाराष्ट्र सर्कलसाठी 3 री गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज केला असेल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. डाक विभागाने निवडलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यासोबतच पुढील प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रकही स्पष्ट केले आहे.

Post Office GDS 3rd Merit List 2026 या यादीमध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली आहे, त्यांना आता कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. डाक विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, शॉर्टलिस्ट झालेल्या सर्व उमेदवारांना दिनांक २६ मे २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी आपल्याला मिळालेल्या संबंधित विभागीय कार्यालयात (Divisional Office) उपस्थित राहावे लागेल.

उमेदवारांनी या वेळेची मर्यादा पाळणे अत्यंत आवश्यक आहे, कारण या अंतिम तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराला पडताळणीसाठी अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही आणि वेळेत न पोहोचल्यास निवड रद्द केली जाऊ शकते.

Post Office GDS 3rd Merit Cut Off List 2026 Download Here

Post Office GDS 2nd Merit Cut Off List 2026 Download Here

Post Office GDS 1 st Merit Cut Off List 2026 Download Here

पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

कागदपत्र पडताळणीसाठी जाताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांचे मूळ दस्तऐवज (Original Documents) आणि त्यासोबत सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींचे २ सेट (2 sets of photocopies) सोबत घेऊन जाणे अनिवार्य करण्यात आले आहे.

यामध्ये प्रामुख्याने तुमचे दहावीचे गुणपत्रक, वयाचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस किंवा दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) या गोष्टींचा समावेश आहे. जे की तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना जी कागदपत्रे दिली होती ते तुम्हाला पडताळणी समिती समोर द्यावे लागणार आहे.

या प्रक्रियेची वैयक्तिक माहिती उमेदवारांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे आणि ईमेल आयडीवर पाठवली जात आहे, त्यामुळे उमेदवारांनी आपले संदेश नियमितपणे तपासून पाहावेत.

Post Office GDS 3rd Merit List Cut Off 2026

या वेळेस जाहीर झालेल्या यादीमध्ये वेगवेगळ्या विभागांनुसार गुणांची टक्केवारी बरीच चुरशीची पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, पुणे, सांगली आणि सोलापूर अशा विविध विभागांमध्ये उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर निवड झाली आहे.

वेगवेगळ्या प्रवर्गांचा विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी (UR) आणि इतर मागास प्रवर्गासाठी (OBC) बहुतांश ठिकाणी ९२% ते ९६% च्या दरम्यान गुणांची टक्केवारी असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळाली आहे, तर काही विशेष प्रवर्गाचा कट-ऑफ त्याहून कमी आलेला दिसतो.

ज्या उमेदवारांनी अजूनही आपले नाव तपासले नाही, त्यांनी त्वरित अधिकृत संकेतस्थळावरून ही (Post Office GDS 3rd Merit List 2026) पाहून यादीत आपले रजिस्ट्रेशन नंबर तपासून घ्यावे आणि पुढील तयारीला लागावे.

Post Office GDS 3rd Merit Cut Off List 2026 Download Here

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment