PMC NUHM Recruitment 2025 आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहीर

Published On: April 28, 2025
Follow Us
PMC NUHM Recruitment 2025

PMC NUHM Recruitment 2025 आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती निघाली असून, जाहिरातीमध्ये नमूद अटी व शर्ती पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

PMC NUHM Recruitment 2025

आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अॅन्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मधील राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत खालील कंत्राटी रिक्त पदे संवर्गनिहाय भरण्यात येत आहेत.

PMC NUHM Recruitment

अटी व शर्ती

इच्छुक उमेदवारांनी दिनांक १७/०४/२०२५ ते ३०/०४/२०२५ पर्यंत इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी, पुणे महानगरपालिका, शहर क्षयरोग केंद्र, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र (गाडीखाना), ६६६ शुक्रवार पेठ, मंडई जवळ, शिवाजीरोड, पुणे ४११००२ येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. तदनंतर अर्जाची छाननी करून उमेदवारांची पात्र अपात्र इत्यादीबाबत सविस्तर माहिती वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर https://www.pmc.gov.in प्रसिद्ध करण्यात येईल.

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांचा तपशील

  • पासपोर्ट साईज फोटो,
  • जन्म तारखेकरिता (वयाचा दाखला/दहावीचा शाळासोडल्याचा दाखला/टीसी/जन्म प्रमाणपत्र)
  • फोटो आयडी/रहिवाशी दाखला

शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र

  • शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका,
  • अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्र,
  • अनुभव प्रमाणपत्र
  • शैक्षणिक अर्हता व प्राधान्य पात्रता प्रमाणपत्र या अनुषंगाने इतर आवश्यक स्वयम साक्षांकित प्रती
  • महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्रानंतरचे नाव) त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.

सदरील पदे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) समिती अंतर्गत राहतील, त्याचा पुणे महानगरपालिका आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.

उमेदवाराकडून सदर अर्ज अर्धवट, अपूर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केला असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारांकडून कोणत्याही स्वरुपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही.

अनुभव शासकीय, निमशासकीय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी अंतर्गत अनुभव ग्राह्य धरण्यात येईल.

अधिक माहितीसाठी: PMC NUHM Recruitment 2025 मूळ जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत वेबसाईट: https://www.pmc.gov.in/l/recruitment

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

arogya sevika bharti new gr

आरोग्य सेविका भरतीसाठी मोठा बदल; पात्रता गुणांची मर्यादा 45 वरून 35 टक्के – शासन निर्णय

August 13, 2026
shikshaketar-padbharti-GR

राज्यातील या शाळांमध्ये शिक्षकेतर पदभरतीला शासनाची मंजुरी; 80 टक्के पदे भरता येणार

August 12, 2026
Pavitra Portal Teacher Recruitment

पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ; 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

August 11, 2026
maharojgar melava 2026-27

राज्यात 1 हजार रोजगार मेळावे; युवकांना नोकरीसाठी दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण मिळणार

August 5, 2026
talathi bharti notification 2026

तलाठी पदांच्या 1539 जागांसह MPSC गट क पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध, डाउनलोड डायरेक्ट लिंक

August 3, 2026
public-exam-malpractice-bill-2026

लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2026 मंजूर; पेपरफुटी प्रकरणांत 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

August 2, 2026

Leave a Comment