Mahadiscom Recruitment: विद्युत सहाय्यक पदाच्या परीक्षेचे स्वरूप बदलले! परीक्षेची तारीख, हॉल तिकीट आणि सुधारित अभ्यासक्रम संपूर्ण माहिती

Published On: May 6, 2025
Follow Us
Mahadiscom Recruitment

Mahadiscom Recruitment: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत सरळसेवा भरतीचे शुध्दीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. सदर भरती ही जाहिरात क्र. 06/2023 नुसार होत आहे. त्यानुसार आता विद्युत सहाय्यक पदाच्या परीक्षेचे स्वरूप बदलले असून, परीक्षेची तारीख, हॉल तिकीट आणि सुधारित अभ्यासक्रम संपूर्ण माहिती पाहूया.

Mahadiscom Recruitment | Vidyut Sahayak Bharti विद्युत सहाय्यक भरती

  • भरतीचे नाव: विद्युत सहाय्यक भरती 2023
  • संस्था: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL)
  • जाहिरात दिनांक: 29 डिसेंबर 2023
  • जाहिरात क्र.: 06/2023

पदांचा तपशील

  • पदाचे नाव: विद्युत सहाय्यक (Vidyut Sahayyak)
  • एकूण जागा: ५३४७

शैक्षणिक पात्रता:

उमेदवाराने इलेक्ट्रिकल/ वायरमन/ पॉवर टेक्नॉलॉजी किंवा तत्सम शाखेमध्ये ITI (NCVT/SCVT) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा

  • सामान्य प्रवर्ग: 18 ते 27 वर्षे
  • मागासवर्गीय (SC/ST/OBC): कमाल वयात सवलत शासन नियमांनुसार
  • माजी सैनिक (Ex-Servicemen): निवृत्ती वेळी त्यांचे वय आणि सेवेचा कालावधी विचारात घेऊन सवलत मिळू शकते (खाली माहिती दिली आहे).

मानधनाचे तपशील

  1. प्रथम वर्ष: ₹15,000/- प्रती महिना
  2. द्वितीय वर्ष: ₹16,000/- प्रती महिना
  3. तृतीय वर्ष: ₹17,000/- प्रती महिना
vidyut sahayak bharti 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात येथे पाहा

Vidyut Sahayak Exam Date 2025

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत “विद्युत सहाय्यक” हे पद भरण्यासाठी दि. २९/१२/२०२३ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीकरीता ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरुपाची ऑनलाईन क्षमता चाचणी (Vidyut Sahayak Exam Date 2025) सर्वसाधारणपणे दि. 20 ते 22 मे, 2025 दरम्यान घेण्यात येणार आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

विद्युत सहाय्यक पदाच्या परीक्षेसाठी सुधारीत अभ्यासक्रम जाहीर, Vidyut Sahayak Exam Syllabus 2025

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सरळसेवा भरतीचे शुध्दीपत्रक जाहीर, जाहिरात क्र. ०६/२०२३

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत ‘विद्युत सहाय्यक‘ या पदाकरीता माहे डिसेंबर 2023 मध्ये जाहिरात क्र. 06/2023 प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदाची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन क्षमता चाचणी दि. 20 ते 22 मे, 2025 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे.

Vidyut Sahayak (electrical Assistant) या पदाच्या परीक्षेसाठी आता, परीक्षेचे सुधारीत स्वरूप खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे.

Vidyut Sahayak Exam Syllabus 2025

टीप: मुळ जाहिरातीनुसार संबंधित परीक्षामधील (Name of Test) प्रश्नांची संख्या व त्यांचे गुण यामधील तुलनात्मक गुणांचे प्रमाण (weightage) हे उक्त सुधारीत परीक्षेच्या स्वरूपामध्ये अबाधित ठेवण्यात आली आहे.

Mahadiscom Recruitment महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना दंड (Penalty) असेल, त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकुण गुणांच्या १/४ (०.२५ टक्के) इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण ग्राह्य धरण्यात येतील. तथापि, उमेदवाराने एखादा प्रश्नाचे उत्तर न दिल्यास/रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना दंड (Penalty) लागणार नाही.
  • सदर जाहिरातीमध्ये मुद्दा क्र. ७.६ पुढीलप्रमाणे वाचण्यात यावे, “उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत एकूण ८० गुणांपैकी प्राप्त गुणांचे रूपांतर ९० गुणांमध्ये करून त्यामध्ये बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना १० गुणांपैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त असे एकुण १०० गुणांपैकी प्राप्त गुणांच्या आधारे निवड यादी / निकाल तयार करण्यात येईल. उमेदवारांना शुन्य अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील अशा उमेदवारांचा निकालाकरीता विचार करण्यात येणार नाही.”
  • मूळ जाहिरात क्र. ०६/२०२३ मधील तसेच या जाहिराती संदर्भात यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रक / शुद्धीपत्रकातील इतर अटी व शर्ती अबाधीत राहतील.

Vidyut Sahayak Hall Ticket 2025

Vidyut Sahayak (electrical Assistant) या परीक्षेचे सर्वसाधारण स्वरुप, वेळ, हॉल तिकीट इ. ची मार्गदर्शक माहिती लवकरच कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in प्रसिध्द करण्यात येईल. सबब, उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करण्याचे आवाहन MahaDiscom कडून करण्यात आले आहे.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Maharashtra Anganwadi Bharti 2026

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीची संपूर्ण माहिती

February 1, 2026
NHM Raigad Recruitment 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), रायगड अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर

January 11, 2026
Maharashtra Shikshak Bharti

शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा बदल! आता ‘ही’ संस्था राबवणार संपूर्ण प्रक्रिया; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

January 7, 2026
Maha CET Cell Recruitment 2026

राज्याच्या सीईटी सेलमध्ये मोठी भरती! आता आपल्याच जिल्ह्यात मिळणार काम! ‘या’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा सविस्तर

December 28, 2025
MPSC Rajyaseva Notification 2026 PDF Download

MPSC Rajyaseva 2026: राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर माहिती जाणून घ्या 

December 26, 2025
University Professor Recruitment

मोठी बातमी! राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापक पदभरतीचा मार्ग मोकळा; ’60:40′ सूत्र निश्चित, गुणवत्तेवर भर – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

December 14, 2025

Leave a Comment