TAIT Exam Application Date Extended शिक्षक भरतीच्या टेट परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Published On: May 7, 2025
Follow Us
TAIT Exam Application Date Extended

TAIT Exam Application Date Extended महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरतीसाठी TAIT Exam 2025 करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (mscepune) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे प्रसिद्धी निवेदन दिनांक 6 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आले आहे.

TAIT Exam Application Date Extended संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे.

TAIT Exam Application Date Extended टेट परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दि. 10 मे 2025 पर्यंत देण्यात आली होती. मात्र आता मुदतवाढ देण्यात आली असून, दिनांक 14 मे 2025 पर्यंत TAIT Exam साठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच ऑनलाईन आवेदनशुल्क भरण्याची मुदत दिनांक 14 मे 2025 रोजी 23.59 मि. पर्यंत असणार आहे.

MAHA TAIT Exam New Rule 2025 जाहीर, नवीन नियम आणि अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती जाणून घ्या

दि. ०२/०५/२०२५ शासन शुद्धिपत्रकानुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार यांना देखील शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र राहतील. मात्र दि. ०५/०५/२०२५ पूर्वी आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना सदर सुधारित तरतूदीचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्यांनी पुनःश्च ऑनलाईन आवेदनपत्र भरावे. पुनःश्च भरलेले ऑनलाईन आवेदनपत्र अंतिम समजून पहिले आवेदनपत्र रद्द करण्यात येईल.

उमेदवारांची इतर स्पर्धा परीक्षा असल्यास माहिती भरण्याचे आवाहन

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025 परीक्षा घेण्याचे आयोजन दि. 24 मे 2025 ते दि. 5 जून 2025 या कालावधीमध्ये करण्यात आले असून B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थी/उमेदवारांचा परीक्षा कालावधी दि. २४/०५/२०२५ ते दि. ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये नियोजित असेल तर अशा विद्यार्थी/उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025 Info.aspx या लिंकद्वारे दि. 14 मे 2025 पर्यंत सादर करावी. जेणेकरुन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (TAIT) 2025 परीक्षेला प्रविष्ठ असलेल्या उमेदवारांचे परीक्षेच्या बॅचेसचे नियोजन करणे सुलभ होईल.

उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील असे प्रसिद्धी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.

अधिकृत वेबसाईट : https://www.mscepune.in/

TAIT Exam Application Date Extended

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Maharashtra Anganwadi Bharti 2026

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीची संपूर्ण माहिती

February 1, 2026
NHM Raigad Recruitment 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), रायगड अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर

January 11, 2026
Maharashtra Shikshak Bharti

शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा बदल! आता ‘ही’ संस्था राबवणार संपूर्ण प्रक्रिया; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

January 7, 2026
Maha CET Cell Recruitment 2026

राज्याच्या सीईटी सेलमध्ये मोठी भरती! आता आपल्याच जिल्ह्यात मिळणार काम! ‘या’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा सविस्तर

December 28, 2025
MPSC Rajyaseva Notification 2026 PDF Download

MPSC Rajyaseva 2026: राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर माहिती जाणून घ्या 

December 26, 2025
University Professor Recruitment

मोठी बातमी! राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापक पदभरतीचा मार्ग मोकळा; ’60:40′ सूत्र निश्चित, गुणवत्तेवर भर – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

December 14, 2025

Leave a Comment