राज्यातील मनपा, नगरपालिका शिक्षकांसाठी गुड न्यूज: पेन्शनबाबत लवकरच निर्णय! Mnpa Nagarpalika Teacher Pension Update

By MarathiAlert Team

Updated on:

Mnpa Nagarpalika Teacher Pension Update राज्यभरातील महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे! त्यांच्या निवृत्तीवेतन (पेन्शन) योजनेत सुधारणा करण्याबाबत राज्य सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेणार आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली आहे.

शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांनी शिक्षकांच्या पेन्शन योजनेबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनीही चर्चेत भाग घेतला.

Mnpa Nagarpalika Teacher Pension Update

मंत्री सामंत यांनी सांगितले की, राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ पासून कर्मचाऱ्यांसाठी अंशदान निवृत्तीवेतन योजना (Contributory Pension Scheme) लागू केली आहे. त्यानंतर २०१५ मध्ये ही योजना केंद्र सरकारच्या नवीन निवृत्तीवेतन योजनेत (New Pension Scheme) समाविष्ट करण्यात आली. आता महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षकांनाही ही अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत अर्थ विभागाकडे विचार सुरू आहे.

पुढील एक ते दीड महिन्यात यासंबंधीची फाईल (नस्ती) अर्थ विभागाकडे जाईल आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. याशिवाय, महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील शिक्षकांना शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच फायदे मिळावेत, यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत लवकरच एक बैठक आयोजित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण यामुळे त्यांची निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा अधिक मजबूत होईल.

विधानपरिषद तारांकित प्रश्नाची यादी डाउनलोड करा

विधानसभा तारांकित प्रश्नांची यादी डाउनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!