‘पीएम-ई-विद्या’ शैक्षणिक वाहिन्यांचे प्रक्षेपण महाराष्ट्रात सुरू, डायरेक्ट लिंक PM E Vidya Channel List

By MarathiAlert Team

Updated on:

PM E Vidya Channel List विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण घरापर्यंत पोहोचावे यासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘पीएम-ई-विद्या‘ शैक्षणिक वाहिन्यांचे प्रक्षेपण महाराष्ट्रात सुरू झाले आहे. ‘वन क्लास वन टीव्ही चॅनेल’ या संकल्पनेनुसार देशभरातील विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी एकूण २०० शैक्षणिक वाहिन्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यापैकी महाराष्ट्रासाठी ५ विशेष वाहिन्या सुरू करण्यात आल्या आहेत.

PM E Vidya Channel List

PM E Vidya Channel List या शैक्षणिक वाहिन्या ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र’ (SCERT) यांच्या सहकार्याने चालवल्या जात आहेत. ‘पीएम-ई-विद्या 113 ते 117’ या वाहिन्यांवर इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमावर आधारित दर्जेदार शैक्षणिक कार्यक्रम दाखवले जातात. प्रत्येक वाहिनीवर दोन इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाचे प्रक्षेपण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार अभ्यास करणे शक्य झाले आहे.

‘पीएम-ई-विद्या वाहिन्या’ या टॅबमध्ये उपलब्ध

हे शैक्षणिक कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी भागांमधील शिक्षणाची दरी कमी करण्यास मदत करत आहेत. या वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडीओमुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि प्रभावी झाली आहे. याचा फायदा शिक्षकांनासुद्धा होत आहे, कारण त्यांना शिकवण्यासाठी एक उत्तम साधन मिळाले आहे.

‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र’ चे संचालक राहुल रेखावार यांनी सर्व शिक्षक, अधिकारी आणि पालकांना या वाहिन्या यूट्यूबवर सबस्क्राइब करण्याचे आवाहन केले आहे.

यासाठी लागणाऱ्या सर्व लिंक्स परिषदेच्या अधिकृत वेबसाइट www.maa.ac.in वर ‘पीएम-ई-विद्या वाहिन्या’ या टॅबमध्ये उपलब्ध आहेत. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ घेता येत आहे. तुम्हीसुद्धा या शैक्षणिक वाहिन्यांच्या माध्यमातून आपल्या मुलांना घरबसल्या दर्जेदार शिक्षण देऊ शकता.

PM E Vidya Channel List SCERTM शैक्षणिक वाहिन्या डायरेक्ट लिंक

या वाहिन्या डीडी-फ्री डिशवर उपलब्ध आहेत. तसेच, तुम्ही या वाहिन्या यूट्यूबवर थेट (लाईव्ह) पाहू शकता. दररोज सहा तासांचे शैक्षणिक कार्यक्रम दाखवले जातात आणि हे कार्यक्रम दिवसभरात तीन वेळा पुन्हा प्रक्षेपित (repeat telecast) होतात. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक त्यांच्या सोयीनुसार हे कार्यक्रम पाहू शकतात.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.maa.ac.in/index.php?tcf=pmev

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!