ICDS Supervisor Bharti : अंगणवाडी सेविकांसाठी सुवर्णसंधी! 272 मुख्यसेविका पदांसाठी पदोन्नती भरती सुरू, संपूर्ण माहिती

Published On: May 8, 2025
Follow Us
ICDS Supervisor Bharti

ICDS Supervisor Bharti एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई, महिला व बाल विकास विभाग अंतर्गत शहरी प्रकल्पांमधील अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका/पर्यवेक्षिका (गट-क) पदांसाठी निवड पद्धतीने पदोन्नतीद्वारे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेद्वारे एकूण 272 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही भरती मर्यादित विभागीय परीक्षा द्वारे होणार आहे. याबाबतची सविस्तर जाहिरात ICDS Department Official Website icds.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची संपूर्ण माहिती पाहूया.

ICDS Supervisor Bharti 2025

  • पदाचे नाव: मुख्यसेविका / पर्यवेक्षिका (गट-क)
  • एकूण पदे: २७२

महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी: ३० एप्रिल २०२५ (सकाळी ११:००) ते २० मे २०२५ (रात्री ११:५५) पर्यंत.
  • परीक्षेची तारीख: लवकरच icds.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल आणि उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळवली जाईल.

शैक्षणिक अर्हता व अनुभव: १ जानेवारी २०२५ रोजी:

  • संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी.
  • अंगणवाडी सेविका पदावर विनाखंड आणि नियमित १० वर्षांची सेवा पूर्ण झालेली असावी आणि सध्या कार्यरत असावे.
  • हिंदी व मराठी भाषा उत्तीर्ण.
  • एम.एस.सी.आय.टी. किंवा समकक्ष संगणक अर्हता.

वयोमर्यादा:

  • १ जानेवारी २०२५ रोजी उमेदवाराचे वय किमान २१ वर्षांपेक्षा कमी आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

ICDS Supervisor Bharti अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने icds.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सादर करावेत.
  • उमेदवाराने फक्त एकच अर्ज सादर करावा.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

परीक्षा शुल्क:

  • सर्व प्रवर्गांसाठी परीक्षा शुल्क १००० रुपये असेल.

निवड प्रक्रिया:

  • निवड ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने होईल.
  • प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल आणि प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतील.
  • गुणवत्ता यादीत येण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • समान गुण मिळाल्यास उमेदवारांचा प्राधान्यक्रम शासनाच्या नियमानुसार लावला जाईल.
  • मुलाखत घेतली जाणार नाही.

आरक्षण:

  • १००% पदे महिलांसाठी आरक्षित आहेत.
  • एकूण पदांपैकी ४% पदे दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित आहेत. दिव्यांग आरक्षणासंदर्भात शासनाच्या नियमानुसार कार्यवाही केली जाईल.
  • आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. खुल्या गटातील महिलांसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे.

मुख्यसेविकेची कर्तव्ये व जबाबदाऱ्या: मुख्यसेविकेला अंगणवाडी सेविकांच्या कामाचे पर्यवेक्षण करणे, कार्यक्रम आखणे, क्षेत्रीय समस्यांचे निराकरण करणे, कुटुंबांची यादी तयार करणे, लक्ष्य गट ओळखणे, जन्म-मृत्यू नोंदी अद्ययावत ठेवणे, कुपोषित बालकांची ओळख पटवणे, वजन घेणे, औषधोपचार देणे, आरोग्य केंद्रात समन्वय साधणे, पोषण आहारावर देखरेख ठेवणे, नियमित क्षेत्रीय भेटी देणे, मासिक बैठका घेणे, गृहभेटींसाठी मार्गदर्शन करणे, नोंदी तपासणे, आरोग्य व पोषण शिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करणे, कार्यात्मक साक्षरता वर्गांना मदत करणे, स्थानिक समित्यांच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन करणे आणि शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीत सहाय्य करणे इत्यादी कामे करावी लागतात.

आवश्यक कागदपत्रे: ऑनलाईन अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या छायांकित प्रती अपलोड कराव्या लागतील:

  • नावाचा पुरावा (आधार कार्ड, पॅनकार्ड इ.).
  • वयाचा पुरावा (जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला इ.).
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे (१०वी, १२वी, पदवी).
  • मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र.
  • नावात बदल झाल्याचा पुरावा (गॅझेट प्रत).
  • हिंदी व मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा (१०वी प्रमाणपत्र).
  • संगणक ज्ञान पुरावा (एम.एस.सी.आय.टी. किंवा समकक्ष प्रमाणपत्र).
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
  • अनुभव प्रमाणपत्र (संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याने दिलेले पदोन्नती पात्रता प्रमाणपत्र). कागदपत्र पडताळणीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.

दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना:

  • लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांना लेखनिक आणि इतर सोयी-सवलती शासनाच्या नियमानुसार मिळतील.
  • लेखनिकाची आवश्यकता असल्यास अर्ज सादर करताना नमूद करावे. आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.
  • लेखनिकाची व्यवस्था उमेदवाराला स्वतःच्या खर्चाने करावी लागेल.
  • परीक्षेच्या वेळी लेखनिकासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करावी लागतील.
  • अर्जामध्ये दिव्यांगत्वाची माहिती नमूद न केल्यास किंवा कागदपत्रे अपलोड न केल्यास ऐनवेळी लेखनिक मिळणार नाही.

ICDS Supervisor Bharti महत्वाच्या सूचना:

  • निवड सूची १ वर्षासाठी किंवा रिक्त पदे भरली जाईपर्यंत वैध राहील.
  • मुख्यसेविका म्हणून निवड झाल्यानंतर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
  • नियुक्ती होणाऱ्या उमेदवारास नवीन परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू राहील.
  • निवड झालेल्या महिला उमेदवारा महाराष्ट्र राज्यात कोठेही नियुक्ती किंवा बदलीसाठी पात्र राहतील.
  • प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी साधारणपणे ८ ते १० दिवस अगोदर वेबसाइटवर उपलब्ध होतील. उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल व मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळवले जाईल.
  • परीक्षेला येताना प्रवेशपत्राची रंगीत छायांकित प्रत, मूळ ओळखपत्र आणि त्याची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
  • परीक्षेच्या केंद्रावर मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास सक्त मनाई आहे.
  • परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास किंवा इतर भत्ता दिला जाणार नाही.
  • गैरवर्तन, नैतिक अधःपतन किंवा कोणत्याही कारणास्तव सेवेतून बडतर्फ असल्यास उमेदवार अपात्र ठरतील.

अधिक माहिती आणि अद्ययावत सूचनांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाच्या icds.gov.in या संकेतस्थळाला नियमित भेट देणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी : मूळ जाहिरात येथे पाहा

भरती प्रक्रिया संदर्भात महत्वाचे परिपत्रक

ICDS Department Official Website : https://icds.gov.in/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

NHM Raigad Recruitment 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), रायगड अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर

January 11, 2026
Maharashtra Shikshak Bharti

शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा बदल! आता ‘ही’ संस्था राबवणार संपूर्ण प्रक्रिया; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

January 7, 2026
Maha CET Cell Recruitment 2026

राज्याच्या सीईटी सेलमध्ये मोठी भरती! आता आपल्याच जिल्ह्यात मिळणार काम! ‘या’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा सविस्तर

December 28, 2025
MPSC Rajyaseva Notification 2026 PDF Download

MPSC Rajyaseva 2026: राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर माहिती जाणून घ्या 

December 26, 2025
University Professor Recruitment

मोठी बातमी! राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापक पदभरतीचा मार्ग मोकळा; ’60:40′ सूत्र निश्चित, गुणवत्तेवर भर – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

December 14, 2025
BMC Peon Recruitment

मुंबई उच्च न्यायालयात 887 पदांसाठी मोठी भरती, जाहिरात प्रसिद्ध

December 10, 2025

Leave a Comment