IGR Maharashtra Bharti 2025 दहावी वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी! संपूर्ण माहिती जाणून घ्या

Published On: May 2, 2025
Follow Us
IGR Maharashtra Bharti 2025

IGR Maharashtra Bharti 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. नोंदणी व मुद्रांक विभागात सरळसेवेने भरावयाची रिक्त गट ड पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या लेखात आपण या भरतीशी संबंधित पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्वाचे मुद्दे संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

IGR Maharashtra Bharti 2025

नोंदणी व मुद्रांक विभागात गट ड (शिपाई) संवर्गाची नोंदणी व मुद्रांक विभागाकडील सरळसेवेने भरावयाची रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

रिक्त पदांचा तपशील

  • पदाचे नाव: गट ड (शिपाई)
  • एकूण रिक्त पदे: 284
  • वेतनश्रेणी : एस-01, रु.15000-47600 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे गट ड मधील खालील तक्त्यात नमूद केलेल्या विविध संवर्गाच्या संख्येप्रमाणे भरावयाच्या सर्व पदांचा तपशिल सोबतच्या परिशिष्ट 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.

IGR Bharti vacunt post

आवश्यक शैक्षणिक पात्रता

सरळसेवेने भरावयाच्या शिपाई पदासाठी शैक्षणिक अर्हता पुढीलप्रमाणे आहे. उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षा (एस एस सी SSC) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • सर्वसाधारण प्रवर्गासाठी: 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी: शासन नियमांनुसार सवलत
IGR Bharti age limit

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 22.04.2025
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 10.05.2025
  • ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत 10.05.2025
  • परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी 7 दिवस

परीक्षा शुल्क

  • खुल्या प्रवर्गाच्या उमदेवारांसाठी रु 1000/-
  • मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु 900/-
  • अनाथ उमेदवारांसाठी रु 900/-
  • माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनीक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.

परीक्षेचे स्वरूप, दर्जा व निवडीची कार्यपद्धती

शिपाई पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार असून, परीक्षेचे स्वरूप व दर्जा खालील प्रमाणे राहील.

IGR Bharti exam syllabus

अर्ज प्रक्रिया

सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपुर्ण माहिती काळजीपुर्वक वाचून ऑनलाईन (Online) पद्धतीनेच https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/ या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक अद्यावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

अधिक माहितीसाठी: मूळ जाहिरात पीडीएफ येथे डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment