ITI Admission 2025 Maharashtra आयटीआय प्रवेश 2025 अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Published On: June 8, 2025
Follow Us
ITI Admission 2025 Maharashtra

ITI Admission 2025 Maharashtra कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२५ सत्रासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु केल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक https://admission.dvet.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. सविस्तर माहिती पाहूया.

ITI Admission 2025 Maharashtra New Time Table 2025

महत्वाच्या तारखा आणि प्रक्रिया:

ऑनलाईन अर्ज भरणे: १५ मे २०२५ पासून सकाळी ११.०० वाजल्यापासून २६ जून २०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येतील. यात अर्ज दुरुस्त करण्याची आणि शुल्क जमा करण्याची सोय आहे.

अर्ज निश्चित करणे (Confirmation): उमेदवारांनी १५ मे २०२५ पासून सकाळी ११.०० वाजल्यापासून २७ जून २०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत राज्यातील कोणत्याही शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर अर्ज निश्चित करावा. अर्ज निश्चित करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

पहिल्या प्रवेश फेरीसाठी पर्याय सादर करणे: २६ मे २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून २७ जून २०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत प्रवेश शुल्क भरल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय आणि संस्थानिहाय विकल्प व प्राधान्ये सादर करता येतील.

प्राथमिक गुणवत्ता यादी: ३० जून २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल आणि उमेदवारांना SMS द्वारे कळविण्यात येईल.

हरकती आणि माहितीतील बदल: १ जुलै २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून ३० जून २०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदवता येतील आणि प्रवेश अर्जातील निवडक माहितीत बदल करता येईल. त्यानंतर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही.

अंतिम गुणवत्ता यादी: ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

पहिली प्रवेश फेरीची निवड यादी: ९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाईल.

प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही: पहिल्या फेरीतील निवड झालेल्या उमेदवारांनी १० जुलै २०२५ सकाळी ९.०० वाजल्यापासून १५ जुलै २०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत संबंधित संस्थेत सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा.

पुढील फेऱ्या: दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे, ज्यात विकल्प सादर करणे आणि प्रवेश निश्चित करण्याच्या तारखांचा समावेश आहे.

दुसरी प्रवेश फेरी: २२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत निवड यादी प्रसिद्ध होईल. प्रवेश निश्चितीसाठी २३ जुलै २०२५ सकाळी ९.०० वाजल्यापासून २८ जुलै २०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत मुदत आहे.

तिसरी प्रवेश फेरी: ३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत निवड यादी प्रसिद्ध होईल. प्रवेश निश्चितीसाठी ४ ऑगस्ट २०२५ सकाळी ९.०० वाजल्यापासून ८ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत मुदत आहे.

चौथी प्रवेश फेरी: १३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत निवड यादी प्रसिद्ध होईल. प्रवेश निश्चितीसाठी १४ ऑगस्ट २०२५ सकाळी ९.०० वाजल्यापासून १९ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत मुदत आहे.

समुपदेशन फेरी: जे उमेदवार विहित मुदतीत अर्ज सादर करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ३ जुलै २०२५ सकाळी ९.०० वाजल्यापासून २० ऑगस्ट २०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत नव्याने ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. समुपदेशन फेरी २१ ऑगस्ट २०२५ पासून सुरु होईल.

अर्ज प्रक्रिया शुल्क:

  • राखीव प्रवर्ग (Reserved Category): रु १००
  • अराखीव प्रवर्ग (UnReserved Category): रु १५०
  • महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State): रु.३००
  • अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential Indian): रु.५००

महत्वाचे मुद्दे:

  • प्रवेशाची सविस्तर माहिती “माहितीपुस्तिका – प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती” १५ मे २०२५ पासून प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे.
  • प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थेत १५ मे २०२५ पासून दररोज सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे.
  • अर्ज भरताना “Primary Mobile Number” नोंदवणे अनिवार्य आहे, कारण सर्व माहिती SMS द्वारे पाठवली जाईल. हा मोबाईल नंबर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलता येणार नाही.
  • उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास सर्व अर्ज रद्द होतील.
  • निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन निवडपत्र (Allotment Letter) उपलब्ध करून दिले जाईल.
  • पसंतीक्रमानुसार पहिल्या पर्यायानुसार जागा मिळाल्यास, उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल आणि त्यानंतर तो केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेऱ्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाही.
  • खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील संस्थास्तरावरील जागा १० जुलै २०२५ पासून उपलब्ध असतील.
  • पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) अंतर्गत असलेल्या २५० औ.प्र. संस्थांमधील २०% जागा विशेष प्रशिक्षण शुल्क आकारून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील.
  • शासकीय औ.प्र. संस्थांमधील PPP योजनेंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध जागा (IMC Seats) आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्यात येणाऱ्या जागांवर प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार ८० ते १००% व्यवसाय प्रशिक्षण प्रतिपूर्ती योजना लागू आहे.
  • सर्व शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांतील सर्व प्रकारच्या जागांसाठी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनेच होतील. ऑनलाईन प्रवेश प्रणालीव्यतिरिक्त घेतलेले प्रवेश ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी, उमेदवारांनी ज्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकडीत प्रवेश घेत आहेत ती NCVT शी संलग्न आहे की नाही, याची खात्री www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळावर करावी.
  • अद्ययावत प्रवेश वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर आणि सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असेल.

अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी नियमितपणे https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

ITI Admission 2025 Maharashtra
ITI Admission Maharashtra 2025
ITI Admission Maharashtra
ITI Admission

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

JNV Admission 2026

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू, डायरेक्ट लिंक

July 31, 2026
pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026

Leave a Comment