महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. नुकताच सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाला असून, आता महाराष्ट्रातील दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra SSC & HSC Result Date 2026) याबाबतची सविस्तर अपडेट पाहूया.
Mahahsscboard Result date 2026
Maharashtra SSC & HSC Exam निकालही आता लवकरच जाहीर होणार आहे. मागील वर्षी 12 th result 5 may रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला होता. तर दहावीचा निकाल (SSC Result) 13 May रोजी जाहीर करण्यात आला होता. यंदा 12 वी परीक्षेचा निकाल 2 मे 2026 रोजी दुपारी एक वाजता जाहीर होत आहे.
निकाल कधी जाहीर होऊ शकतो? (संभाव्य तारखा)
मंडळाने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु डिजीलॉकर सारख्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर आता 12th Class Results Coming Soon असे अपडेट आले आहे.
मागील वर्षांचा कल आणि उत्तरपत्रिका तपासणीची गती पाहता खालीलप्रमाणे संभाव्य वेळापत्रक असू शकते.
- बारावीचा निकाल (HSC Result 2026): मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 2 मे 2026 रोजी जाहीर
- दहावीचा निकाल (SSC Result 2026): बारावीच्या निकालानंतर साधारण १० ते १२ दिवसांनी म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा १५ मे २०२६ च्या सुमारास जाहीर होण्याची शक्यता आहे.
निकाल ऑनलाईन कसा पाहायचा?
निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे खालील दोन गोष्टी असणे आवश्यक आहे.
१. सीट नंबर (Seat Number) २. आईचे नाव (Mother’s First Name)
- सर्वप्रथम खाली दिलेल्या कोणत्याही अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होमपेजवर ‘SSC Result 2026’ किंवा ‘HSC Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा हॉल तिकीटवरील अचूक सीट नंबर आणि आईच्या नावाचे पहिले ३ अक्षरे किंवा पूर्ण नाव (नोंदणीनुसार) टाका.
- ‘View Result’ बटणावर क्लिक करा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंट काढून ठेवा किंवा पीडीएफ सेव्ह करा.
यंदा फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या या परीक्षांना राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. अधिकृत तारखेची घोषणा मंडळाकडून लवकरच एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली जाईल.







