Maharashtra Special Teachers Adjustment: राज्यातील समग्र शिक्षा (सर्व शिक्षा अभियान) अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत महत्वपूर्ण खुलासा केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषद सदस्य अॅड. निरंजन डावखरे, श्री. प्रविण दरेकर, श्री. प्रसाद लाड आणि डॉ. परिणय फुके यांनी राज्यातील १५७ दृष्टीहीन व ६१ इतर दिव्यांग प्रवर्गातील अशा २१८ दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
Table of Contents
विशेष शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात शिक्षण मंत्र्यांचा मोठा खुलासा
🔹 ३० सप्टेंबर २०२४: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, समग्र शिक्षा योजनेंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर ४८६० पदांवर समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
🔹 ८ ऑक्टोबर २०२४: शासनाने अधिकृतरित्या निर्णय निर्गमित केला असून, २१८ दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
🔹 कागदपत्र पडताळणी व नियुक्ती प्रक्रिया सुरू: शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करून उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व छाननी करण्यासंदर्भात सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
🔹 समायोजन प्रक्रियेसाठी आवश्यक कालावधी: शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले की, केंद्रस्तरावर पदस्थापना देण्याची प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.
