Mofat Ganvesh Yojana 2025 ही महाराष्ट्र शासनाची विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सहकार्य करणारी एक महत्वाची योजना आहे. राज्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थी आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. यावर्षीपासून दारिद्र्यरेषेवरील मुलांनाही लाभ देण्यात येणार आहे.
Mofat Ganvesh Yojana 2025
शाळा व्यवस्थापन समितीमार्फत थेट अंमलबजावणी: शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून या योजनेची अंमलबजावणी थेट शाळा व्यवस्थापन समितीमार्फत केली जाणार आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाकडून गणवेशासाठी मंजूर रक्कम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून थेट शाळा समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल.
MHT CET 2025 Admit Card Released Direct link to PCB Group Download
गणवेश रंग व डिझाईन ठरवण्याचे स्वातंत्र्य: योजनेअंतर्गत वापरल्या जाणाऱ्या गणवेशाच्या कपड्यांचा दर्जा उत्तम असावा, त्वचेस इजा होणार नाही, तसेच 100% पॉलिस्टरचा वापर टाळावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या योजनेत स्काऊट व गाईड विषय असलेल्या शाळांमध्ये दोन वेगवेगळे गणवेश ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व शाळांसाठी शिक्षण विभागाने जाहीर केले हे नवीन वेळापत्रक
गणवेशाचा रंग आणि डिझाईन शाळा व्यवस्थापन समिती ठरवू शकते. गुणवत्ता तपासणीसाठी विभागीय शिक्षण अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी यादृच्छिक पद्धतीने तपासणी करतील आणि निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधित शाळा व्यवस्थापन समितीला जबाबदार धरले जाईल.
मोफत गणवेश योजना 2025 ही विद्यार्थ्यांना शालेय जीवनात आत्मविश्वास आणि समानतेची भावना देणारी, तसेच शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी एक उपयुक्त योजना ठरणार आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.