Sevarth Pranali Circular महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेवार्थ प्रणालीमध्ये आपली 7 प्रकारची अत्यावश्यक माहिती अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
Table of Contents
Sevarth Pranali Circular
सद्यस्थितीत सर्व शासकीय कार्यालयांकडून राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन देयंकाच्या संस्करणसाठी व अनुषगिक कामकाजासाठी सेवार्थ प्रणाली वापरली जात आहे. शासकीय कामकाजासाठी सेवार्थ प्रणालीचे अन्य शासकीय प्रणलीशीं एकात्मिककरण करण्याची आवश्यकता भविष्यात निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सेवार्थ प्रणालीतील विदा (Data) माहिती अद्ययावत आणि अचूक असणे आवश्यक आहे.
सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करायची माहिती
अद्ययावत करायची माहिती: या परिपत्रकानुसार, कर्मचाऱ्यांनी खालील 7 प्रकारची माहिती सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करणे आवश्यक आहे.
- मोबाईल क्रमांक
- वैवाहिक स्थिती
- आईचे नाव
- वडिलांचे नाव
- जोडीदाराचे नाव
- पत्ता
- पिन कोड
महत्वाच्या सूचना
- सेवार्थ प्रणालीत ही माहिती अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- नवीन कर्मचाऱ्यांची माहिती भरताना, ही माहिती भरल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
- ज्या कर्मचाऱ्यांची माहिती सध्या अपूर्ण आहे, त्यांनी ती तातडीने भरावी.
- जर अधिकाऱ्यांनी ही माहिती वेळेत अद्ययावत केली नाही, तर त्यांचे मे २०२५ चे वेतन देयक स्वीकारले जाणार नाही.
Sevarth Pranali मध्ये माहिती कशी अद्ययावत करावी?
परिपत्रकात माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया स्पष्टपणे दिली आहे.
- सर्वप्रथम, DDO_AST लॉगिनमध्ये माहिती अद्ययावत करावी.
- त्यानंतर, DDO लॉगिनमध्ये Worklist > Payroll > Changes > Drafts of Changes या मार्गाद्वारे ती Approve करावी.

माहिती अद्ययावत केल्यानंतर, त्याचा अहवाल सेवार्थ प्रणालीतून जनरेट होईल. या अहवालाची एक प्रत एप्रिल २०२५ च्या वेतन देयकासोबत जोडून संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
परिपत्रक
जर कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांच्या वेतनास उशीर होऊ शकतो, आणि यासाठी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी स्वतः जबाबदार असतील, असे परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे, आणि त्याचा संगणक सांकेतांक 202504091557459805 आहे.
या परिपत्रकाद्वारे, शासनाने कर्मचाऱ्यांच्या माहिती व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे.
अधिक माहितीसाठी: परिपत्रक डाउनलोड करा