अकरावी प्रवेशाची पहिली यादी या तारखेला जाहीर होणार, महत्त्वाच्या सूचना जारी! 11th Admission FYJC 1st Merit List Date

Published On: June 6, 2025
Follow Us
11th Admission FYJC 1st Merit List Date

11th Admission FYJC 1st Merit List Date इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ५ जून २०२५ रोजी संपली आहे. या मुदतीपर्यंत एकूण ११,२९,९२४ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज (भाग १ व भाग २) पूर्ण करून लॉक केले आहेत. शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये सन २०२५-२६ पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबवले जात आहेत. या प्रक्रियेत दि ५ जून अंतिम मुदतीपर्यंत एकूण १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

11th FYJC Admission New Update

अर्ज पूर्ण करण्यासाठी शेवटची संधी!

ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग १ लॉक केला आहे, पण भाग २ भरायचा राहिला आहे किंवा लॉक करायचा राहिला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. तुम्ही तुमचा भाग २ दिनांक ६ जून २०२५ रोजी दुपारी १२:१५ ते उद्या, ७ जून २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजेपर्यंत भरू शकता आणि लॉक करू शकता.

या वेळेत भाग २ पूर्ण न केल्यास, तुम्हाला तात्पुरत्या गुणवत्ता यादीसाठी (प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट) आणि पहिल्या फेरीत महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र धरले जाणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भाग २ लॉक केला आहे, त्यांना यावेळी पसंतीक्रम बदलण्याची सुविधा मिळणार नाही.

ज्यांनी अर्ज भरला नाही, त्यांनी काळजी करू नका!

काही विद्यार्थ्यांनी ५ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केली नसेल, किंवा प्रवेश अर्ज भाग १ भरला नसेल, किंवा अर्धवट भरला असेल, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्ज भाग १ आणि भाग २ भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे, तुम्ही पुढील फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करून वेळेत आपला अर्ज भरा आणि लॉक करा.

प्रवेश प्रक्रियेची सद्यस्थिती:

शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेसाठी राज्यातील ९,४३५ कनिष्ठ महाविद्यालये/उच्च माध्यमिक शाळांची नोंदणी झाली आहे. यामध्ये एकूण २१,२३,०४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे, ज्यात कॅप फेरीसाठी १८,९७,५२६ आणि कोटा प्रवेशासाठी २,२५,५१४ जागा आहेत.

आकडेवारीनुसार, ही माहिती समोर आली आहे:

  • १२,१५,१९० विद्यार्थ्यांनी नोंदणी (रजिस्ट्रेशन) शुल्क ऑनलाइन जमा केले आहे.
  • १२,०५,१६२ विद्यार्थ्यांनी अर्ज भाग-१ भरला आहे.
  • ११,२९,९२४ विद्यार्थ्यांनी अर्ज भाग-२ भरून अंतिम करून लॉक केले आहेत.
  • नियमित फेरी (कॅप राऊंड) साठी ११,२९,९३२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
  • इनहाऊस कोटा साठी ६४,२३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
  • व्यवस्थापन (मॅनेजमेंट) कोटासाठी ३२,७२१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
  • अल्पसंख्याक (मायनॉरिटी) कोटासाठी ४७,५७८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

11th Admission FYJC 1st Merit List Date

11th Admission FYJC 1st Merit List Date वेळापत्रकानुसार शून्य फेरी गुणवत्ता यादी 8 जून 2025 रोजी जाहीर होणार असून दिनांक 9 जून ते 11 जून 2025 या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत. तसेच कॅप फेरीची गुणवत्ता यादी 10 जून 2025 रोजी जाहीर होणार असून दिनांक 11 जून ते 18 जून 2025 या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत.

पुढील महत्त्वाचे टप्पे:

  • शून्य फेरी गुणवत्ता यादी: ८ जून २०२५ रोजी जाहीर होईल.
  • शून्य फेरीतील प्रत्यक्ष प्रवेश: ९ जून ते ११ जून २०२५ या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये होतील.
  • कॅप फेरीची गुणवत्ता यादी: १० जून २०२५ रोजी जाहीर होईल.
  • कॅप फेरीतील प्रत्यक्ष प्रवेश: ११ जून ते १८ जून २०२५ या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये होतील.

विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ https://mahafyjcadmissions.in ला भेट द्यावी. तसेच, काही शंका असल्यास support@mahafyjcadmissions.in या ईमेल आयडीवर किंवा ८५३०९५५५६४ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

FYJC Admission Maharashtra

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026
Safety Audit letter

राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय!

July 18, 2026

Leave a Comment