RTE 25 Admission New Rule Feedback बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 नुसार बालकांची शाळांमधील राखीव RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित नियम तयार करण्यात येत आहे. यासाठी शासनास शिफारशी करण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केली आली आहे. यापूर्वी शासनाने आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे नियम तयार केले आहेत. आता त्यानुसार या समितीस RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया बाबतचे अभिप्राय देण्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्व पालकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
Table of Contents
RTE 25 Admission New Rule Feedback
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 कलम 12 (सी) (1) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के प्रवेश मोफत देण्यात येतात.
शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दि. 29-01-2025 अन्वये मा. आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखाली बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 नुसार बालकांची शाळांमधील राखीव २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित नियम तयार करण्याच्या अनुषंगाने शासनास शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
मा. समिती अध्यक्ष यांचे निर्देशानुसार आरटीई 25 टक्के प्रवेश कायदा अधिनियम दि. 24 में, 2012 नुसार व सुधारित सूचना शासन निर्णय 16 जानेवारी, 2018 नुसार राबविण्यात येत आहे. यात अधिक सुलभता यावी या अनुषंगाने सदर समितीस उपरोक्त विषयाबाबतचे पालकांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत.
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुधारित नियम अभिप्राय
RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे सुधारित नियम हे 16 जानेवारी, 2018 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत आहे. त्यामुळे अभिप्राय देण्याअगोदर अवश्य 16 जानेवारी, 2018 रोजीचा शासन निर्णय वाचावा. लिंक खाली दिली आहे.
अभिप्राय देतानाच्या सूचना खालीलप्रमाणे देण्यात आल्या आहेत.
- अभिप्राय हे 100 शब्द मर्यादेतच असावेत.
- अभिप्राय मोघम असू नयेत.
- अभिप्रायामध्ये कोणीतीही व्यक्ती, संस्था, शाळा या वर टिका टिपणी असू नये.
- विषयाशी संबंधितच अभिप्राय असावेत.
- आरटीई पोर्टलवर “पालकांचे अभिप्राय” या खाली अभिप्राय देण्यात यावे.
अभिप्राय देण्याचा कालावधी: दि. 11-04-2025 ते 25-04-2025 पर्यंत देण्यात आली आहे.
RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया शासन निर्णय व अभिप्राय डायरेक्ट लिंक
- आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया दिनांक 16 जानेवारी, 2018 रोजीचा शासन निर्णय येथे डाउनलोड करा.
- आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अभिप्राय देण्यासाठी : डायरेक्ट लिंक
अधिक माहितीसाठी RTE च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://student.maharashtra.gov.in/
