NCTE Bed Bridge Course Details बी.एड. पदवी असलेल्या आणि प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्त असलेल्या शिक्षकांसाठी NCTE ने Bridge Course चे Notification जारी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानुसार, ज्या शिक्षकांची नियुक्ती एका विशिष्ट तारखेपूर्वी झाली आहे, त्यांना आता नोकरी गमावण्याची भीती नाही. मात्र, या शिक्षकांना आता सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स (6 Months Bridge Course) पूर्ण करावा लागणार आहे. नेमके हा निर्णय कोणासाठी आहे? या ब्रिज कोर्सचे संपूर्ण तपशील जाणून घेऊया.
Table of Contents
NCTE Bed Bridge Course Details
एनसीटीई द्वारे जारी करण्यात आलेल्या 7 एप्रिल 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (NCTE) प्राथमिक शिक्षकांसाठी ६ महिन्यांचा एक खास कोर्स तयार केला आहे. या कोर्सला शिक्षण मंत्रालयाने देखील मान्यता दिली आहे. या Bridge Course चे संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे आहे.
काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?
सर्वोच्च न्यायालयाने ८ एप्रिल २०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार, ज्या बी.एड. पदवीधर शिक्षकांची नियुक्ती शैक्षणिक नियमांनुसार झाली आहे, त्यांना त्यांच्या पदावरून काढले जाणार नाही. मात्र, हा नियम फक्त त्या शिक्षकांसाठी लागू आहे ज्यांची नियुक्ती ११ ऑगस्ट २०२३ पूर्वी झाली आहे आणि ज्यांच्या नियुक्तीवर कोणत्याही न्यायालयाने कोणताही विशेष नियम किंवा अट घातलेली नव्हती.
हा कोर्स कोणासाठी आहे?
हा ब्रीज कोर्स फक्त त्या प्राथमिक शिक्षकांसाठी आहे ज्यांची नियुक्ती २८ जून २०१८ च्या NCTE च्या नियमांनुसार बी.एड. पदवीच्या आधारावर झाली आहे आणि जे सर्वोच्च न्यायालयाच्या ११ ऑगस्ट २०२३ च्या निर्णयापूर्वी सेवेत होते.

हा कोर्स करणे का महत्त्वाचे आहे?
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, ज्या शिक्षकांनी ठरलेल्या वेळेत हा कोर्स पूर्ण केला नाही, त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे जे शिक्षक या नियमांमध्ये बसतात, त्यांनी हा कोर्स वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.
या कोर्सनंतर काय?
हा ब्रिज कोर्स पूर्ण केल्यावर या शिक्षकांची सध्याची नोकरी सुरक्षित राहील. मात्र, हे लक्षात ठेवा की, हा कोर्स फक्त सध्याची नोकरी वाचवण्यासाठी आहे. या कोर्सच्या आधारावर भविष्यात प्राथमिक शिक्षक म्हणून नवीन नोकरी मिळवण्यासाठी हा कोर्स ग्राह्य धरला जाणार नाही.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) लवकरच या कोर्सबद्दल अधिक माहिती आणि वेळापत्रक जाहीर करतील. त्यामुळे, ज्या शिक्षकांना हा कोर्स करायचा आहे, त्यांनी NCTE आणि NIOS च्या वेबसाइट्सवर लक्ष ठेवावे.

