WCD Dhule Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी मदतनीस पदभरती जाहीर, संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया येथे पाहा

Published On: April 8, 2025
Follow Us
WCD Dhule Anganwadi Bharti 2025

WCD Dhule Anganwadi Bharti 2025 महिलांसाठी सुवर्णसंधी! महिला व बाल विकास विभागांतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी 2025 ची भरती जाहीर झाली आहे. या भरतीत एकूण 21 पदे रिक्त असून, किमान १२वी उत्तीर्ण महिलांना अर्ज करण्याची संधी आहे. अर्जाची अंतिम तारीख 15 एप्रिल 2025 असून अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. वाचा सविस्तर पात्रता, अटी, कागदपत्रांची यादी, Anganwadi Madatnis Payment आणि अर्ज प्रक्रिया.

अंगणवाडी भरती 2025 – सविस्तर माहिती | WCD Dhule Anganwadi Bharti 2025

शैक्षणिक पात्रता

  • किमान १२वी उत्तीर्ण (राज्य मंडळ किंवा समकक्ष परीक्षा).

स्थानिक रहिवासी अट

  • अर्ज करणारी महिला त्या शहराची रहिवाशी असावी.
  • अधिकृत रहिवाशी दाखला लागेल.

वयोमर्यादा

  • 18 ते 35 वर्षे.
  • विधवा महिलांसाठी कमाल वय 40 वर्षे.
  • वयाचा पुरावा – शाळा सोडल्याचा दाखला/जन्म प्रमाणपत्र इ.

लहान कुटुंब अट

  • उमेदवाराच्या फक्त दोनच हयात अपत्ये असावीत.
  • यासाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आवश्यक.

मराठी भाषेचे ज्ञान

  • मराठी विषयासह किमान एक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

विशेष बाबींसाठी आवश्यक कागदपत्रे

  • विधवा – पतीचा मृत्यू दाखला आणि विधवा प्रमाणपत्र.
  • अनाथ – संबंधित प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
  • मागासवर्गीय उमेदवार – जातीचा दाखला.
  • अनुभव – किमान 2 वर्षांचा सरकारी अंगणवाडीचा अनुभव (खाजगी अनुभव ग्राह्य नाही).

इतर अटी

  1. फक्त एक अर्ज सादर करावा.
  2. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय अर्ज अपात्र ठरेल.
  3. अर्ज 22 एप्रिल 2025 पूर्वी प्रत्यक्ष कार्यालयात सादर करावा.
  4. निवड गुणांनुसार गुणवत्ता यादीवरून केली जाईल. परीक्षा/मुलाखत नाही.
  5. निवड झाल्यावर इतर केंद्रावर बदली शक्य नाही. प्रवास भत्ता मिळणार नाही.
  6. मूळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक.
  7. नियुक्ती मानधनावर आधारित आहे, भत्ते मिळणार नाहीत.
  8. सेवा वयोमर्यादा: 60 वर्षे किंवा शारीरिक असमर्थतेपर्यंत.
  9. नियुक्तीमधून निर्माण होणाऱ्या कोणत्याही तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.

नोट: रिक्त पदांचा तपशील व केंद्रानुसार जागा सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF पाहावी.

Anganwadi Madatnis Payment

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना खालीलप्रमाणे मानधन अदा करण्यात येते.

अर्जाची प्रक्रिया

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे.
  • अर्जाचे नमुने संबंधित प्रकल्प कार्यालयातून किंवा अधिकृत वेबसाईटवरून मिळतील.
  • भरलेला अर्ज, आवश्यक कागदपत्रांसह संबंधित प्रकल्प अधिकारी कार्यालयात जमा करावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापासून 10 दिवस

➡️ 15 एप्रिल 2025

अंगणवाडी भरती जाहिरात

अधिक माहितीसाठी: अंगणवाडी मदतनीस पदभरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

अधिकृत वेबसाईट: https://dhule.gov.in/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Pavitra Portal Teacher Recruitment

पवित्र पोर्टल 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू; या तारखेपर्यंत पसंतीक्रम लॉक करणे आवश्यक

August 7, 2026
maharojgar melava 2026-27

राज्यात 1 हजार रोजगार मेळावे; युवकांना नोकरीसाठी दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण मिळणार

August 5, 2026
talathi bharti notification 2026

तलाठी पदांच्या 1539 जागांसह MPSC गट क पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध, डाउनलोड डायरेक्ट लिंक

August 3, 2026
public-exam-malpractice-bill-2026

लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2026 मंजूर; पेपरफुटी प्रकरणांत 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

August 2, 2026
NHM CHO Exam Date 2026

मोठी अपडेट! राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत CHO भरती परीक्षेची तारीख जाहीर

August 1, 2026
mpsc exam update

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय! CBT परीक्षा पद्धती स्थगित; पूर्व परीक्षा OMR पद्धतीनेच होणार

July 23, 2026

Leave a Comment