महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज, शनिवारी दुपारी १:०० वाजता ऑनलाइन स्वरूपात जाहीर होत आहे. निकालाच्या या काळात विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारी धाकधूक, ताणतणाव आणि भविष्यातील संधींबाबत असणाऱ्या शंका दूर करण्यासाठी मंडळाने विशेष समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली आहे.
बारावीचा निकाल जाहीर – आकडेवारी येथे चेक करा
12 वी परीक्षा निकाल: मंडळ निहाय यादी प्रसिद्ध, विशेष समुपदेशन सेवा
निकालाचा हा क्षण अनेक विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा असतो, तर काहींसाठी तो चिंतेचा विषय ठरू शकतो. हीच बाब लक्षात घेऊन पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या मंडळांमधील विद्यार्थ्यांसाठी राज्य स्तरावर तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे समुपदेशक विद्यार्थ्यांना निकालाचा स्वीकार कसा करावा, गुणांबाबत काही शंका असल्यास काय करावे आणि पुढील शैक्षणिक वाटचाल कशी असावी, याबद्दल मोफत मार्गदर्शन करणार आहेत.
समुपदेशन सेवा हेल्प लाईन नंबर
विद्यार्थी आणि पालकांच्या सोयीसाठी मंडळाने एकूण दहा समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत.

हे क्रमांक पुढील आठ दिवसांपर्यंत सकाळी ८:०० ते रात्री ८:०० या वेळेत कार्यान्वित राहतील. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता केवळ एका फोन कॉलद्वारे तज्ज्ञांशी संवाद साधता येणार आहे.
शिक्षण मंडळाने घेतलेला हा पुढाकार केवळ निकालापुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक सकारात्मक पाऊल आहे. गुणांच्या स्पर्धेत विद्यार्थी खचून जाऊ नयेत आणि पालकांनीही त्यांना योग्य आधार द्यावा, असा संदेश या प्रकटनातून मिळतो. त्यामुळे कोणत्याही दडपणाखाली न राहता, आवश्यकतेनुसार या सेवेचा लाभ घेणे विद्यार्थी आणि पालकांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या : https://mahahsscboard.in/









